सोशल मीडियावर सध्या व्हिडिओ बनवून प्रसिद्धी झोतात येण्याच एक वेगळंच फॅड आलं आहे.त्यामुळे उठं सुट नागरीक व्हिडिओ बनवत आहेत.काही व्हिडिओ मनोरंजनात्मक असतात.तर काही व्हिडिओ माहितीपूर्ण असतात. पण काही रिलस्टार भलतेच व्हिडिओ बनवून दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात. जळगावमधील इमरान भिस्ती हा रिलस्टार अशाचप्रकारे रिल्स बनवायचा.या त्याच्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर दहशतीचे वातावरण असायचे.
advertisement
इमरान भिस्तीचे दोन व्हिडिओ दहशत माजवणारे होते. पहिल्या व्हिडिओमध्ये त्याने बॉलिवूडच गाणं लावून एक व्हिडिओ बनवला होता.या व्हिडिओच्या माध्यमातून त्याने भाईगिरी केली होती. त्याचसोबत दुसऱ्या व्हिडिओत डायलॉगबाजी करून व्हिडिओ बनवला होता. हे दहशत माजवणारे व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागताच त्यांनी इमरान भस्तीला उचलले होते.
इमरान भस्तीला पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्याला पोलीसी खाक्या दाखवला होता. हा पोलीसी खाक्या मिळताच त्याची सगळी भाईगिकी उतरली होती.त्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात माफी मागणारा व्हिडिओ बनविला होता.इम्रान विरुद्ध प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली आहे. पोलिसांनी अशा प्रकारच्या व्हिडिओंद्वारे समाजात भीती पसरवणाऱ्या तरुणांना इशारा देत सांगितले की, भाईगिरी दर्शवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.