नेमकं काय म्हणाले पोलीस?
कोथरुडमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार शरद मोहोळ साथीदारासोबत घराकडे जात असताना मुन्ना उर्फ साहिल पोळेकर आणि इतर दोघांनी रस्त्यातच गोळीबार केला. गोळीबारानंतर त्या ठिकाणाहून तिन्ही आरोपी पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. तिथं चौकशी करण्यात आली. त्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी पोळेकरचं नाव सांगितलं. तो सोबत असताना त्यानेच मोहोळवर गोळीबार केला. गुन्हेशाखेने तपासासाठी पथकं तयार केली. त्यात पोळेकरच्या घराचा, मूळ गावाचा शोध घेतला. तो सापडला नाही. तेव्हा तो दुचाकीवरून पळून गेल्याचं समजलं.
advertisement
त्रयस्थ माणसाची गाडी होती. गाडीचा शोध घेतला असता ती बेवारस आढळली. पोळेकरकडे चार चाकी असल्याचं समजलं. गाडीचा नंबर ट्रेस केला. त्यानंतर शहराच्या बाहेर जाणाऱ्या रस्त्यावर शोध घेतला. त्यानंतर पथके रवाना झाली आणि सातारा रोडला शिरवळजवळ दोन चार चाकी गाडी त ८ आरोपी आढळून आले.
गोळीबाराची घटना घडली त्यात तिघांनी गोळ्या झाडल्या. तिन्ही पिस्टल जप्त केले आहेत. मुन्ना पोळेकरने गुन्ह्याची कबुली दिलीये. याच कामासाठी त्यांनी तीन-चार महिन्यांपूर्वी पिस्टल आणले होते. या घटनेत मुख्य आरोपी मुन्ना उर्फ साहिल पोळेकर, त्याचा मामा नामदेव महिपती कानगुडे आणि विठ्ठल किसन गांडले यांचं शरद मोहोळसोबत वैमनस्य होतं. त्याच प्रकारातून हल्ला झाल्याचं प्रथमदर्शनी आढळून आलं आहे.
आरोपींचा शोध घेत असताना दोन गाड्यात ८ लोक होते. त्यात दोन वकील होते. ते त्यांच्यासोबत का गेले, कशासाठी गेले, गुन्ह्यात त्यांची काय भूमिका हे तपासानंतर कळेल असं पोलिसांनी म्हटलं आहे.
