'स्वस्थ नारी, सशक्त परिवार'ला सुरुवात होणार, मोदींची संकल्पना असलेलं अभियान कसं?
नमूद केलेल्या वयापेक्षा 2022 पासून 2025 पर्यंत संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे आणि भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. नुकताच याबाबतचा शासन निर्णय गृह मंत्रालयाने जारी केलेला आहे. त्यामुळे वय निघून गेलेल्या उमेदवारांना ही नामी संधी आहे, वय निघून गेलेल्या उमेदवारांना खरोखरंच ही मोठी संधी आहे. सन 2024 पर्यंत रिक्त होत असलेल्या आणि 2025 मध्ये रिक्त होणार्या पदांचा आढावा घेऊन 15 हजार पदांची पोलीस भरती करण्यात येणार आहे. पाच प्रकारच्या पदांसाठी ही भरती होणार असून त्याची जाहिरात गृह मंत्रालयाने 10 सप्टेंबर 2025 रोजी प्रकाशित केली आहे.
advertisement
पुणेकरांसाठी खुशखबर! पुणे स्टेशन–सनसिटी दरम्यान पीएमपीची नवीन बस सेवा
पोलिस भरती प्रक्रियेमध्ये ज्यांची वयोमर्यादा संपली आहे, अशा उमेदवारांना सरकारने दिलासा दिला आहे. सन 2022 ते 2025 पर्यंतच्या सर्व उमेदवारांना फॉर्म भरून भरतीसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. या सुवर्णसंधीचा सर्वच उमेदवारांना लाभ घेता येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून याबाबतचे जीआर काढण्यात आला आहे. त्यामुळे, वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना ही चागंली संधी आहे. गेल्या 2-3 वर्षांपासून पोलीस भरती रखडली होती. त्यामुळे, विद्यार्थ्यांसह विविध संघटनांकडून भरतीची मागणी केली जात होती. अखेर, भरती प्रक्रिया सुरू झाली असून वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही शासनाने संधी देऊ केली आहे.
वाहन चालकांसाठी महत्वाची बातमी! लर्निंग लायसन्सच्या प्रक्रिये होणार बदल?
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई आणि कारागृह विभागातील कारागृह शिपाई वर्गातील 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत निवृत्त झालेले आणि 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 कालावधीत निवृत्त होणारे एकूण 15, 631 पदे भरती केले जाणार आहे. शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांकानुसार सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरीता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात येत आहे.त्यामुळे, 2022 ते 2025 या 4 वर्षांच्या कालावधीतील वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना संधी मिळणार आहे.
हे फक्त झेडपी शाळेतच घडू शकतं, सरांसाठी पोरं ढसाढसा रडली, Video पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी!
शासनाच्या नव्या पत्रकानुसार, पोलीस शिपाई पदासाठी 12 हजार 399 जागांची भरती होणार आहे. तर पोलीस शिपाई चालक पदाच्या एकूण 234 जागा भरल्या जाणार आहेत. बॅण्ड्समन पदाच्या एकूण 25 जागा भरल्या जाणार आहेत. तर सशस्त्र पोलीस शिपाई पदाच्या एकूण 2 हजार 393 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. कारागृह शिपाई 580 पदे अशी 15 हजार 631 पदे भरली जाणार आहेत.