याबाबत पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीत म्हटले की, मागील वर्षी अल्पवयीन असताना देखील वडिलांनी पारोळा तालुक्यात ग्रामीण भागातील एका तरुणाशी जबरदस्तीने लग्न लावून दिले होते. यात त्यानंतर तिच्या पतीने अल्पवयीन असताना देखील वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवल्याने तरुणी गर्भवती झाली. तिला पोटात त्रास झाल्याने सरकारी दवाखान्यात दाखल केले असता तिने एका मुलीला जन्म दिला.
advertisement
अल्पवयात लग्न लावून, तरुणीस गर्भवती करून बालकाला जन्म दिला. ही बाब येथील सरकारी दवाखान्यातील डॉक्टराने उघडकीस केली. तेरा वर्षीय तरुणीच्या जबाबावरून, सासर आणि माहेरकडील तुकाराम दिपचंद भिल, मंजाबाई भिल, सुनील भिल, गोकुळ भिल, अजय तुकाराम भिल, भीमराव गायकवाड यांच्याविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
June 08, 2025 8:46 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अल्पवयीन मुलीचे लग्न लावून गर्भवती केल्याबाबत सहा जणांवर गुन्हा, पोलिसांची कडक ॲक्शन
