नेरुळच्या शिवस्मारकाचं बेकायदेशीर उद्घाटन केल्या प्रकरणी अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अमित ठाकरेंना नोटीस बजावण्यासाठी पोलिसांकडून पाच तास प्रतीक्षा करण्यात आली. पाच तासानंतर सुद्धा अमित ठाकरेंनी नोटीस स्वीकारली नाही.तसेच तुम्ही त्रास का घेतलात मी स्वतः पोलीस स्टेशनला आलो असतो.
अमित ठाकरे यांनी नोटीस स्वीकारली नाही . पाच तासानंतर नेरुळ पोलीस नवी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. अमित ठाकरे यांनी नोटीस स्वीकारली नसल्याने पोलीस नवी मुंबईला रवाना झाले आहेत. अमित ठाकरे रविवारी नेरुळ पोलीस स्थानकात स्वतः जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
advertisement
गुन्हा दाखल झाल्यावर अमित ठाकरे काय म्हणाले?
अमित ठाकरे नवी मुंबईत एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी नेरुळमधील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा झाकलेला होता. पुतळ्यावर मोठ्या प्रमाणात धुळ साचली होती. हे पाहावलं गेलं नाही, त्यामुळे अमित ठाकरे यांनी पुतळ्यावरील आवरण बाजूला करून पुतळ्याचं अनावरण केलं. पण, या प्रकरणी नेरळ पोलिसांनी परवानगीशिवाय अनावरण तसंच त्या ठिकाणी मोठी गर्दी जमवल्याचा आरोप करत अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल केला.
राज ठाकरेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली?
गुन्हा दाखल झाल्यावर राज ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिली यावर बोलताना अमित ठाकरे म्हणाले,मी राज साहेबांच्या घरात वाढलो आहे. गुन्हा दाखल झाल्यावर पुढील न्यायलयीन प्रक्रिया काय असते याविषयी मला माहिती आहे. राज ठाकरेंना ज्यावेळी माझ्यावर गुन्हा दाखल झाला याची माहिती मिळाली तेव्हा ते फक्त हसले...
अमित ठाकरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी माझ्यावर गुन्हा दाखल याचा मला अभिमान आहे. महाराजांचा पुतळा घाणेरड्या कपड्यात गुंडाळून ठेवला होता, त्याच्यावर प्रचंड धूळ बसली होती. मी कोणत्याही राजकीय स्वार्थापोटी नाही तर फक्त महाराजांसाठी आणि जनतेसाठी त्याचे अनावरण केले आहे. महाराजांच्या सन्मानासाठी लढणं जर गुन्हा मानला जात असेल तर भविष्यातही असे हजारो ‘गुन्हे’ मी अभिमानाने करेल.
हे ही वाचा :
