TRENDING:

समृद्धी महामार्गावर उद्घाटनानंतर अवघ्या २० दिवसांत खड्डे भरण्याची नामुष्की

Last Updated:

Potholes on Samruddhi Highway, Samruddhi Highway, Samruddhi Highway Potholes, Nagpur Mumbai Samruddhi Highway, समृद्धी महामार्ग, समृद्धी महामार्ग खड्डे पडले

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नरेश पाटील, भिवंडी : नाशिक हजारो कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावर उद्घाटनाच्या २० व्या दिवशी खड्डे भरण्याची नामुष्की ओढावली आहे. त्यामुळे कंत्राटदाराच्या कामाच्या दर्जावर नक्कीच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. समृद्धीवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
समृद्धी महामार्गावर खड्डे
समृद्धी महामार्गावर खड्डे
advertisement

उद्घाटनानंतर अवघ्या २० दिवसांत खड्डे भरण्याची नामुष्की

समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचे ५ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. या महामार्गावर इगतपुरी ते आमणे दरम्यानच्या महामार्गावरील शहापूर तालुक्याच्या हद्दीत अवघ्या २० दिवसात आमणे ते इगतपुरी तसेच इगतपुरी ते आमणे या दोन्ही मार्गिकेवर खड्डे पडले आहेत.

advertisement

इगतपुरी ते आमणे हा समृद्धी महामार्गाचा शेवटचा ७६ किमीचा टप्पा ११८२ करोड रुपये खर्च केल्यानंतर अवघ्या २० दिवसांत पडलेले खड्डे बुजवण्याची नामुष्की रस्ते विकास प्राधिकरणांवर आली आहे. शहापूर तालुक्यात रस्ते भरण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या महामार्गावर वाहनाचा वेग हा प्रतितास ८०, १०० ते १२० दरम्यान असतो. अपघातांना आमंत्रण देणारे खड्डे, उद्घाटनाच्या २० दिवसांत जर पडत असतील तर ते कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे.

advertisement

२० दिवसांपूर्वी समृद्धीच्या अखेरच्या टप्प्याचे उद्घाटन

नागपूर– मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आमणे या ७६ किमी लांबीच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण ५ जून रोजी पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महामार्गाचे लोकार्पण झाले. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीतील अनेक मंत्री उपस्थित होते.

advertisement

'समृद्धी'त भ्रष्टाचार, काँग्रेसची आक्रमक भूमिका

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

देवेंद्र फडणवीस सरकार समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन करून स्वतःची वाहवा करून घेत आहे. परंतु हा महामार्ग भ्रष्टाचाराचे कुरण ठरला आहे. ५५ हजार कोटी रुपयांचा हा महामार्ग शेवटी ७० हजार कोटी रुपयांवर गेला. १५ हजार कोटी रुपयांनी प्रकल्पाचा खर्च फुगवला यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे, त्यामुळे सरकारमध्ये नैतिकता शिल्लक असेल तर समृद्धी महामार्ग प्रकल्पावर एक श्वेतपत्रिका काढावी, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
समृद्धी महामार्गावर उद्घाटनानंतर अवघ्या २० दिवसांत खड्डे भरण्याची नामुष्की
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल