देव दर्शनाहून परतल्यानंतर घरातील कपाटातले कपडे अस्ताव्यस्त पाहून आपल्या घरात घरफोडी झाल्याचे त्यांना समजले. घरातील सर्व मोल्यवान वस्तू आणि पैसे चोरांनी लंपास केल्याचे कळल्यावर कारंडे कुटुंबियांनी थेट तळेगाव पोलिस ठाणे गाठले.
कानून के हात लंबे होते है...!
घरफोडीची सर्व घटना समजून घेत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच घटना स्थळाचा पंचनामा करून चोरांच्या फिंगर प्रिन्ट देखील जमा करण्यात आल्या. घरफोडी एवढ्या चलाखीने करण्यात आली होती की चोरांनी कुठलीही चूक न करता एकही पुरावा मागे ठेवला नव्हता.
advertisement
परंतु पोलिसांनी मावळातील तळेगाव, वडगाव, कामशेत, अशा पंचक्रोशीतल्या सर्व मुख्य बाजार पेठांचे तसेच घर परिसराचे अनेक CCTV कॅमेरे तपासले. त्यात पोलिसांनी दोन संशयितांना ट्रेस करून पुण्यापर्यंत तब्बल ७ दिवस त्यांचा शोध घेतला. अथक परिश्रमानंतर खराडी येथे राहणारा साहील निसार शेख तसेच त्याचा मित्र सद्दाम गुलाब बागवान या दोघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी पोपटासारखं बोलू लागले
आरोपींना ताब्यात घेत तळेगाव पोलिस ठाण्यात पोलिसी खाक्या दाखवत संबंधित घरफोडी बाबत माहिती घेतली असता या दोघांनी घरफोडी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी या दोघांकडून चोरीला गेलेला २४ तोळे हस्तगत केले. पोलिसांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी तपास पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात आणि त्यांच्या सर्व पोलीस सहकाऱ्यांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.
...अन् कारंडे कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास टाकला
या सर्व घरफोडीच्या घटनेत पोलीसांनी ७ दिवस केलेल्या अथक परिश्रम आणि तांत्रिक विश्लेषण करून गुन्हा उघडकीस आणला. तसेच चोरीला गेलेला सर्व मुद्देमालही पोलिसांनी परत मिळवल्यामुळे कारंडे कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास टाकला.
