मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी परिसरात काही अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्रांनी विनोदे यांच्यावर हल्ला चढवला. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे.
हल्लेखोरांपैकी एक सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी वैयक्तिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
advertisement
दरम्यान, अजिंक्य विनोदे यांच्यावर उपचार सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
कोण आहेत अजिंक्य विनोदे?
अजिंक्य विनोदे हे चिंचवडच्या जयहिंद बँकेचे संचालक
राष्ट्रवादी काँग्रेसचे ते पदाधिकारी आहेत
वाकडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते काम करतात
अजिंक्य विनोदे यांचे वडील धनाजी विनोदे हे जयहिंद बँकेचे संस्थापक अध्यक्ष आहेत
धनाजी विनोदे यांची ओळख अजित पवार यांचे कट्टर समर्थक, निकटवर्तीय अशी आहे