दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजिंक्य धनाजी विनोदे असे टोळक्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून चिंचवडमधील जयहिंद अर्बन बँकेचे ते संचालक आहेत. तर सुमित भिकनराव संदानशिव, विकी ऊर्फ प्रथमेश लालासाहेब तिपाले, गौतम परशुराम कांबळे बंटी शांताराम ठाकरे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे असल्याची माहिती समोर आली आहे.
जखमी अजिंक्य विनोदे यांचे मित्र यश नेताजी साखरे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल झाला असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. सराईत आरोपी विकी तिपाले याच्यावर याआधी तडीपारीची कारवाई करण्यात आली होती.
advertisement
अशी घडली घटना
पोलिसांकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार घटनेत जखमी अजिंक्य हे आपले मित्र यश साखरे यांच्यासोबत हिंजवडीतील हॉटेल बेलबॉटम येथे गेले होते. त्यांनी हॉटेलचे मॅनेजर आरोपी सुमित याला हॉटेलचे थकीत भाडे कधी देणार अशी विचारणा केली. या कारणावरून यातील एका आरोपीने तुम्ही येथे काय आमच्याशी भांडणे करायला आलेत का? तुम्हाला माहिती आहे का मी चिंचवडचा भाई विकी तपाले आहे, मी चार वर्ष जेल भोगून आलो आहे. आम्हाला तुम्ही काय हांडगे समजता काय? असे म्हणत वाद घातला.
त्यानंतर आरोपी सुमितने शिवीगाळ करीत असताना दुसरा आरोपी गौतम कांबळे याने शिवीगाळ करीत आज याला जिवंत सोडायचे नाही, असे म्हणूत आपल्या जवळील चाकूने वार केले. आरोपी बंटी ठाकरे याने पिझ्झा कापण्याच्या चकतीने डोक्यात वार केले. आरोपी अथर्व शिंदे याने काटेरी चमच्याने डोक्यात वार केले. आरोपी तिपाले आणि समाधान याने विटा आणि सिमेंट ब्लॉक फेकून मारले. घटनेचा तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.
विकी तिपाले तडीपार गुंड
सराईत गुन्हेगार आरोपी विकी तिपाले याला पोलीस उपायुक्त परिमंडळ एक यांनी १० ऑगस्ट २०२४ रोजी दोन वर्षांकरिता तडीपार केले आहे. मात्र तडीपारीची मुदत पूर्ण होण्याआधीत तो शहरात वास्तव्य करीत असल्याचे या घटनेतून दिसून आले आहे.