त्यांच्याकडून ८ पिस्तुले, जिवंत काडतुसे, तसेच पिस्तुले तयार करण्यासाठी लागणारा मोठा साठा जप्त करण्यात आला असून पुणे शहरात येणारे सगळे शस्त्र याच उमरती गावातून येत असल्याचे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहे. उमरती मोहिमेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये बक्षीस पुणे पोलीस आयुक्तांनी जाहीर केले. ही मोहीम नक्की कशी राबवली गेली? मोहिमेसाठी कुणाकुणाची मदत झाली याची माहिती देण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली.
advertisement
गुंड शरद मोहोळ आणि वनराज आंदेकरांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली पिस्तूल उमरतीवरूनच मागवले होते!
पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ आणि राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली शस्त्र देखील याच उमरती गावातून मागवले असल्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
५० ठिकाणी सर्च ऑपरेशन, संशय येऊ नये म्हणून खाजगी गाड्या!
पुणे पोलिसांनी ५० ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवले. या मोहिमेची कुणकुण कुणाला लागू नये यासाठी पुणे पोलिसांनी खासगी गाड्या वापरल्या. ही मोहीम राबवताना अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती. रात्री अकरा वाजता आम्ही संबंधित गावात पोहोचून कारवाईला सुरुवात केली. पहाटे चार वाजता संपूर्ण गावाला वेढा घातला. मध्य प्रदेश आणि जळगाव पोलिसांचे आम्ही खूप सहकार्य लाभल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले. कारवाईत ३६ जणांना ताब्यात घेण्यात असून ५० भट्ट्या उद्ध्वस्त केल्या. त्यांच्याकडून २१ पिस्तुले, काडतुसे, तसेच पिस्तुले तयार करण्यासाठी लागणारा मोठा साठा जप्त करण्यात आला.
