पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेसला राम राम ठोकला असून येणाऱ्या बुधवारी ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सासवड येथे पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस नेते संजय जगताप यांनी पुढील राजकीय भूमिका स्पष्ट केली. संग्राम थोपटे यांच्यानंतर संजय जगताप यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. संजय जगताप यांच्या प्रचारावेळीच 'तू कसा आमदार होतो तेच पाहतो', असे अजित पवार हे विजय शिवतारे यांना उद्देशून म्हटले होते.
advertisement
आजपर्यंत आम्ही सत्तेसाठी कधीही राजकारण करत नाही किंवा तसे कधी कामही केले नाही. माझे वडील म्हणायचे बर झालं मी आमदार झालो नाही. एक मुलगा अधिकारी झाला आणि आपल्या संस्था चांगल्या झाल्या. आघाड्यांचे राजकारण आता बस्स झाले. ही सोयरिक कुठल्याही हुंड्यासाठी नाही. जिकडे आपण जातोय तिकडे आपला प्रत्येक विषयाला उचलून धरला जाईल, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत १६ तारखेला होईल. प्रवेशानंतर आपण जोमाने काम करू. आपले विषय आपण लावून धरू. सकारात्मक राजकारण करण्याचा प्रयत्न करू, असे संजय जगताप म्हणाले.
संजय जगताप कोण आहेत?
संजय जगताप हे पुरंदरचे काँग्रेसचे नेते आहे
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसकडून विजय मिळवला
२०१९ ते २०२४ दरम्यान त्यांनी पुरंदर विधानसभेचे नेतृत्व केले
शिवतारे यांचे कट्टक विरोधक अशी त्यांची ओळख आहे
जगताप यांनी तालुक्यात काँग्रेस पक्षाची चांगली बांधणी केली होती