विखे पाटील म्हणाले, की महानंद डेअरीचं एनडीडीबीकडे लवकरच हस्तांतरण होणार आहे. पूर्वीच्या लोकांच्या गलथान कारभारामुळे कामगारांसह डेअरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अडचणीत असलेल्या डेअरीला वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रकल्प गुजरात पळवला जात असल्याचं म्हणाऱ्यांच्या डोक्यावर परीणाम झाला असल्याची टिका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
Sanjay Raut : 'महानंद'वरून राजकारण तापलं! डेअरीचे चेअरमन कोण होते? संजय राऊतांचा विखेंना टोला
advertisement
विखे पाटील पुढे म्हणाले, महानंद दूध डेअरीच्या संचालक मंडळाने राजीनामा दिला असून आता त्याचं एनडीडीबीकडे हस्तांतरण केलं जाणार आहे. पूर्वीच्या लोकांच्या गलथान कारभारामुळे कामगारांचा पगार प्रलंबित राहिला आहे. 500 कामगारांना व्हीआरएस देण्याच्या प्रक्रियेवर बैठकीत चर्चा होणार आहे. गुजरातला प्रकल्प देत असल्याची आमच्यावर टीका होत आहे. मात्र, असं म्हणाऱ्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून माहिती न घेता आरोप केला जात असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
संजय राऊतांचा आरोप काय?
संजय राऊत म्हणाले होते की, महानंद डेअरीचं एनडीडीबीकडे हस्तांतरण होणार आहे. यावरती आम्ही अगोदरच मत व्यक्त केलं आहे. एक-एक संस्था, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातकडे वळवले जात आहेत .उद्या मुंबईसुद्धा गुजरातला देतील. ते पुढे म्हणाले, महानंदाचे चेअरमन कोण होते? राधाकृष्ण विखे पाटील यांचे सख्खे मेहुणे. मेहुणे मेहुणे सख्खे पाहुणे . महानंदामध्ये शेकडो कर्मचारी आहेत. विखे पाटील यांच्या पाहुण्यांनी आणि मेहुण्यांनी काय केलं? तुम्ही महाराष्ट्र सरकारची डेअरी चालवू शकत नाहीत? स्वतःच्या डेअरी बरोबर चालू आहेत, असा टोला त्यांनी लगावला होता. खोक्याचं राजकारण बरोबर चालू आहे, असा आरोपही त्यांनी केला होता.
