राजन साळवी यांच्या रुपाने ठाकरे यांचा खास शिलेदार शिंदेंच्या शिवसेनेत सामील झाला. शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताना राजन साळवी यांना अश्रू अनावर झाले. राजन साळवीच नाही तर याआधीही कोकणातील बरेच नेते हे एक तर भाजपमध्ये सामील झाले नाहीतर शिंदेंच्या बंडामध्ये सहभागी झाले. २०१९ च्या निवडणुकीमध्ये कोकणामध्ये शिवसेनेकडे ८ पैकी ६ जागा होत्या. पण एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उदय सामंत यांच्यासह अनेक शिलेदार शिंदेंच्या शिवसेनेत सामील झाले. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत ठाकरे गटाकडे फक्त एकच जागा कशीबशी आली. उलट शिंदेंच्या शिवसेनेनं ५ जागा जिंकल्यात.
advertisement
उद्धव ठाकरेंचं कुठं चुकलं?
कोकणासारख्या बालेकिल्ल्यातच उद्धव ठाकरे यांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. याची अनेक कारणं आता समोर आली आहे. शिवसेनेचं शक्तिस्थान असलेल्या 'मातोश्री'चा ग्राऊंड टच कमी झाला. त्यामुळे तळागळातले कार्यकर्ते हे दुरावले गेले. कोकणामधील प्रकल्प, समस्यांवर धरसोड वृत्ती झाली. त्यामुळे शिवसेनेचं केडर कमकूवत झालं. याचा फायदा हा स्थानिक नेत्यांना झाला. केडरपेक्षा स्थानिक नेते शक्तीशाली बनले. एवढंच नाहीतर मासबेस नसलेल्या नेत्यांकडे जबाबदारी दिली गेली. त्यामुळे स्थानिक पातळीवर पक्षनेतृत्वावर नाराजी वाढत गेली. याची झलक ही एकनाथ शिंदेंच्या बंडाच्यावेळी पाहण्यास मिळाली.
शिलेदारांनी सोडली उद्धव ठाकरेंची साथ
दीपक केसरकर, उदय सामंत सारखे पहिल्या फळीतले नेते हे सकाळी मातोश्रीवर होते अन् संध्याकाळी गुवाहाटीत पोहोचले होते. एकनाथ शिंदे सत्तेत सामील झाल्यानंतर जवळपास सगळ्याच नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली. आता जिकडे मंत्री तिकडे कार्यकर्ते असं समीकरण तयार झालं. परिणामी स्थानिक नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडली, नेत्यांसोबत कार्यकर्त्यांची फळीही गेली. पक्षातील बंडानंतर ठाकरेंनी कोकणात लक्ष दिलं नाही, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला नाही फक्त वरिष्ठ पातळीवर नेत्यांसोबत चर्चा करत होते. याचे परिणाम असे झाले की, स्थानिक पातळीवर पक्षांतर्गत वाद वाढत गेला. पदाधिकाऱ्यांची मनमानी सुरू झाली. त्यामुळे ठाकरे गटाकडून कोकणात पदाधिकाऱ्यांवर कुणाचाच अंकुश राहिला नाही. अखेरीस एकेकाळी ठाकरेंचा कोकणातला बालेकिल्ला आता जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आला आहे.
2019 विधानसभा निवडणूक
भाजप - 1
शिवसेना - 6
राष्ट्रवादी काँग्रेस - 1
2024 विधानसभा निवडणूक
शिवसेना- 5
भाजप - 1
राष्ट्रवादी अजित पवार - 1
शिवसेना उद्धव ठाकरे - 1
कोकणाने बनवला सेनेचा मुख्यमंत्री
1995 च्या निवडणुकीत कोकणात शिवसेनेची मुसंडी
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 11 आमदार
कोकणाच्या विजयात राणेंचा सिंहाचा वाटा
महाराष्ट्रात शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री बनला.
कोकणात शिवसेना उबाठा संपण्याच्या मार्गावर?
पनवेल-
प्रशांत ठाकूर (भाजप)
कर्जत -
महेंद्र थोरवे (शिवसेना)
उरण -
महेश बालदी (भाजप)
पेण -
रवींद्र पाटील (भाजप)
अलिबाग -
महेंद्र दळवी (शिवसेना)
श्रीवर्धन -
अदिती तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
महाड -
भरत गोगावले (शिवसेना)
चिपळूण-
शेखर निकम (राष्ट्रवादी काँग्रेस)
दापोली -
योगेश कदम (शिवसेना)
गुहागर-
भास्कर जाधव (शिवसेना उ.बा.ठा.)
रत्नागिरी-
उदय सामंत (शिवसेना)
राजापूर-
किरण सामंत (शिवसेना)
कणकवली-
नितेश राणे (भाजप)
कुडाळ-
निलेश राणे (शिवसेना)
सावंतवाडी-
दीपक केसरकर (शिवसेना)
