२०१२ साली आम्ही ऊस आंदोलनात २७०० रूपये पहिली उचलीची मागणी केलेली होती. राज्यातील साखर कारखानदार कोणीच दर जाहीर केले नव्हते. त्यावेळेस राज्याचे तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पदाची जबाबदारी स्विकारून तोडगा काढावा म्हणून कर्मयोगी साखर कारखान्यावर धरणे आंदोलन करण्यात आले होते.
सोलापूर-पुणे रास्ता रोको झाल्यानंतर आंदोलनाची तीव्रता वाढली. कुंडलिक कोकाटे हा तरूण शेतकरी या आंदोलनात शहीद झाला. यानंतर शेकडो शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
advertisement
जवळपास आठवडाभर झालेल्या आंदोलनातील संघर्षानंतर २५०० रूपये राजारामबापू कारखान्याने पहिली उचल जाहीर केली व उसदराची कोंडी फुटली. मात्र राज्यभर आंदोलन झाल्याने हजारो आंदोलकावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र राज्यातील उस उत्पादक शेतक-यांना या आंदोलनाने प्रतिटन ३०० रूपये जादा दर मिळाला.
इंदापूर न्यायालयात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम.एच.फारूकी यांचे कोर्टात या गुन्ह्याचे न्यायालयीन कामकाज ॲड. एन जे शहा ,ॲड. महेश ढुके , ॲड. श्रीकांत करे ,ॲड सचिन राऊत ,ॲड. नवनाथ सोनटक्के यांनी विनामुल्य पाहिले.
