अनिल परब यांनी अर्धवट माहिती घेऊन 'सावली डान्सबार'बाबत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. जाणुन बुजून त्यांनी खोटी माहिती सभागृहाला दिली. ही बाब अतिशय गांभीर्याने विधान परिषदेच्या सभापतींनी घेतली पाहिजे. आम्ही तो डान्सबार चालवित नसल्याचे रामदास कदम म्हणाले.
अनिल परब यांच्या आरोपांना रामदास कदम यांचे उत्तर
"सावली बार केल्या ३५ वर्षांपासून माझा आहे. माझी पत्नी ज्योती कदम त्या बारची मालक आहे. शेट्टी नावाच्या गृहस्थाला गेल्या ३५ वर्षापासून आम्ही सावली बार चालवायला दिला आहे. शेट्टीकडे वेटर मुलींची परवानगी आहे आणि ऑर्केस्ट्राची देखील परवानगी आहे. पोलिसांनी ज्यावेळी तिकडे छापा टाकला आणि त्यांना काही चुकीच्या गोष्टी तिथे आढळून आल्या. त्यावेळी आम्ही ताबडतोब त्याच्यासोबतचा करार रद्द करून टाकला", असे रामदास कदम म्हणाले.
advertisement
मुली असलेले हॉटेल आणि ऑर्केस्ट्रा बार आम्ही बंद केलेले असून त्याबाबतचे पुरावे आम्ही आयुक्तांकडे सादर केलेले आहेत. ऑर्केस्ट्रा हा बॉम्बे प्रोविजन ॲक्टखाली येत नाही. ऑर्केस्ट्रा हा ऑफ स्क्रीन डान्स इन हॉटेल २०१६ कलम ८ मध्ये येतो. त्यात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की करार करून जो इसम हॉटेल चालवतो, त्याची सर्व जबाबदारी असते, मालकाची नाही. हा कायदा असतानाही अनिल परब यांनी मालक म्हणून आम्हालाच दोषी धरले. मालकावर गुन्हा दाखल व्हावा आणि राज्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला. आताच्या घटनेचा आणि राजीनाम्याचा काय संबंध? असा सवाल कदम यांनी विचारला.
रत्नागिरीत वाळूचोरीचाही कदम यांच्यावर आरोप
मागील आठवड्यात मंत्री योगेश कदम यांच्या पाठिंब्यामुळेच रत्नागिरीत वाळू चोरी होत असल्याचे सांगून परब यांनी खळबळ उडवून दिली होती. 'वाळू चोरी प्रकरणाशी योगेश कदमांचे संबंध असल्याचे परब सभागृहात म्हणाले. हे आरोपही कदम यांनी फेटाळून लावले होते.