TRENDING:

मोठी बातमी! रत्नागिरीत ऑरेंज अलर्टने भीती, पावसाचा कहर; उद्या शाळा बंद, प्रशासन हाय अलर्टवर

Last Updated:

रत्नागिरी जिल्ह्यात 20 ऑगस्ट 2025 रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रत्नागिरी: हवामान खात्याने 20 ऑगस्ट 2025 रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या अंदाजानुसार जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. संभाव्य पावसाच्या धोक्यामुळे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून जिल्हाधिकारी यांनी तत्काळ आदेश जारी केले आहेत.
News18
News18
advertisement

या आदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना उद्या (20 ऑगस्ट) एक दिवसाची सुट्टी राहणार आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतूक आणि दळणवळणात अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रवासात धोका निर्माण होऊ शकतो, याची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान जिल्हा प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. नद्या-ओढ्यांवरील पाणीपातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पूरप्रवण भागातील लोकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मासेमारांनाही समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

advertisement

पालघरमध्ये शाळा बंद...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

पालघर जिल्ह्यात उद्या देखील मुसळधार पावसाची शक्यता. खबरदारी म्हणून सलग दुसऱ्या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. उद्या देखील पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याने जिल्हा प्रशासनाचा निर्णय.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मोठी बातमी! रत्नागिरीत ऑरेंज अलर्टने भीती, पावसाचा कहर; उद्या शाळा बंद, प्रशासन हाय अलर्टवर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल