TRENDING:

Ravi Rana : 'लाडकी बहीण'च्या वादग्रस्त वक्तव्यानंतर रवी राणांची सारवासारव, आता म्हणाले...

Last Updated:

लाडकी बहीण योजनेवरून आमदार रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता, यानंतर रवी राणा यांनी सारवासारव केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
संजय शेंडे, प्रतिनिधी
'लाडकी बहीण'च्या वादग्रस्त वक्तव्यानंतर रवी राणांची सारवासारव, आता म्हणाले...
'लाडकी बहीण'च्या वादग्रस्त वक्तव्यानंतर रवी राणांची सारवासारव, आता म्हणाले...
advertisement

अमरावती : लाडकी बहीण योजनेवरून आमदार रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता, यानंतर रवी राणा यांनी सारवासारव केली आहे. बहीण भावाच्या नात्यांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात मी गंमतीने ते बोललो आणि सगळ्या महिला तेव्हा हसत होत्या. बहीण-भावाचं नातं हे गमतीचं, आपुलकीचं, प्रेमाचं असलं पाहिजे. त्या नात्यामध्ये मी बोललो मात्र विरोधक त्याचा बाऊ करत आहेत, त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. भाऊ बहिणीला देत असतो, बहिणीकडून परत घेत नसतो, असं रवी राणा म्हणाले आहेत.

advertisement

येणाऱ्या काळामध्ये सरकार आल्यावर पंधराशे रुपयेवरून 3 हजार रुपये महिना करण्याची मागणीही मी केली आहे. आशा वर्करचा पगार वाढवा ही सुद्धा मागणी केली आहे. विरोधकांनी काही चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजे. बहीण भावाच्या नात्यामधील गोष्ट पकडून विरोधक आपली राजकीय पोळी शेकत आहेत, असा आरोप रवी राणा यांनी केला आहे.

काय म्हणाले होते रवी राणा?

advertisement

आमचं सरकार आल्यावर लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपयेचे 3 हजार करू तर आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. जे मला आशीर्वाद देणार नाही, मी तुमचा भाऊ असून 1500 रुपये तुमच्या खात्यातून वापस घेणार, असं रवी राणा म्हणाले होते.

वडेट्टीवारांवर पलटवार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हळदीला उच्चांकी भाव, डाळिंबाचे दरही तेजीत, आल्याची काय स्थिती?
सर्व पहा

रवी राणा यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पलटावर केला. हा पैसा सरकारचा आहे, तुमच्या बापाचा आहे का? असा सवाल वडेट्टीवार यांनी विचारला होता. यावरही रवी राणांनी पलटवार केला आहे. 'सरकार काहीतरी देत आहे, 17 तारखेला पहिल्यांदा महिलांच्या खात्यामध्ये सरकार पैसे टाकणार आहे. खटाखट 8,500 रुपये देण्याचा काँग्रेसचा नारा होता. निवडणुकीनंतर महिलांना काँग्रेस कार्यालयातून हाकललं. खोटं बोलून तुम्ही महिलांचं मतदान घेतलं, पण हे सरकार पहिले देत आहे नंतर मागत आहे', असं प्रत्युत्तर रवी राणांनी दिलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ravi Rana : 'लाडकी बहीण'च्या वादग्रस्त वक्तव्यानंतर रवी राणांची सारवासारव, आता म्हणाले...
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल