महाराष्ट्रातील आम्ही सर्व शेतकरी नेते एकत्र आहोत. ही अभूतपुर्व गोष्ट या ठिकाणी घडताना दिसत आहे. आम्ही वेगवेगळ्या भागात लढतो. पण शेतकऱ्यांची वज्रमुठ एका ठिकाणी आणण्याचं काम बच्चू कडू यांनी केलं आहे. हा मोर्चा अशा ठिकाणी आणला आहे की समृद्धी महामार्ग बंद, हैदराबाद जबलपूर मार्ग बंद केले आहेत. त्यामुळे सरकारचं नाक दाबल्याशिवाय सरकारचं तोंड उघडत नाही,असे रविकांत तुपकर म्हणाले आहेत.
advertisement
जसं बच्चू भाऊ म्हणाले की दोन चार आमदारांना कापा,तसंच मी सांगतो दोन चार मंत्र्यांना कापा, आता मागे हटायचे नाही,असे तुपकर म्हणाले आहेत. शासनाने शेतकऱ्यांना लुटले म्हणून शेतकरी कर्जबाजारी झाले,सरकारने आता शेतकऱ्यांजवळ येऊन शेतकऱ्यांची मागणी मान्य करावी.आम्ही भीक नव्हे तर आमचा हक्क मागायला आलो आहे.आम्ही आत्महत्या करून मरणार नाही,तर हक्क घेऊन मरणार आहोत, असे देखील रविकांत तुपकर यावेळी म्हणाले आहेत.
"जातीचा मोर्चा निघाला की सरकार आंदोलनस्थळी चर्चेसाठी येतं. मग आज आमच्या मातीचा मोर्चा निघाला तर तुम्ही इथे का येऊ शकत नाहीत? हा आमचा सरकारला सवाल आहे. आम्ही तुमच्या दारात येणार नाहीत. तुम्हाला चर्चा करायला शेतकऱ्यांच्या दारात नागपूरच्या वेशीवर यावं लागेल", असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या आंदोलनाला राजू शेट्टी, महादेव जानकर,अॅड माजी आमदार वामन चटप, विजय जावंधिया यांची आंदोलन स्थळी उपस्थिती होती.
