मराठवाडा आणि दुष्काळ नाण्याच्या दोन बाजू आहेत. परंतु फडणवीस यांच्या घोषणेने आता मराठवाडा दुष्काळाच्या जोखडातून मुक्त होण्याची शक्यता आहे.देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यात पाणी आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्यात वळवणे हा त्यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. कोकणातील समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठी त्यांनी ६४ कोटींचा निधी आधीच मंजूर केला आहे.काल शपथ घेतल्या घेतल्या त्यांनी नदी जोड प्रकल्पाबाबत आपला इरादा बोलून दाखवला. नदी जोड प्रकल्प हा मराठवाड्यासाठी भाग्यविधाता प्रकल्प असणार आहे.
advertisement
या प्रकल्पाची रचना नेमकी कशी असेल?
-कोकणातील उल्हास आणि वैनगंगा खोऱ्यातील पाणी समुद्रामध्ये जाते
-समुद्रात जाणारे पाणी धरण बांधून साठवले जाईल
-साठवलेले 55 टीएमसी पाणी उचलून वैनगंगा मध्ये सोडणे
-वैनगंगा मधून हे पाणी मुकणे धरणाच्या माध्यमातून गोदावरी पात्रात सोडले जाईल
-गोदावरी पात्रातून पाणी मराठवाड्यात आणले जाईल
-योजना केवळ 55 टीएमसी पाण्याची
-उल्हास आणि वैतरणा खोऱ्यातील पाणी अडवण्यासाठी धरण बंधने साठी एक टीएमसी पाण्यासाठी एक हजार कोटींचा खर्च अपेक्षित
-त्यामुळे 55 टीएमसी पाण्यासाठी 55 हजार कोटींचा खर्च
-अडवलेले पाणी जवळपास 650 मीटर वर उचलावे लागेल
-किंवा डोंगरातून बोगदा खोदून पाणी आणावे लागणार
कोकणातून पाणी मराठवाड्यात आणणे साठी योजना आहे मात्र पाणी नाशिक जिल्ह्यातून आणावे लागणार आहे..नाशिक आणि मराठवाडा पाणी संघर्ष बघता पाणी सहज येईल असे म्हणता येणार नाही..कारण नाशिक जिल्ह्यातील काही भागांना midc साठी 55 टीएमसी पैकी पाणी पाहिजे आहे. त्यामुळे मराठवाडा विरुद्ध नाशिक असा वाद पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही..मात्र देवेंद्र फडणवीस यांची इच्छा शक्ती पाहत सर्व अडचणींवर मात केल्या जाईल अशी अपेक्षा मराठवाड्याला दिसते आहे.