स्त्री रोग व प्रसुतीशास्त्र संघटना अकलूज व सोलापूर यांच्यावतीने सोलापूर शहरातील नामांकित पंचतारिका हॉटेलमध्ये क्षेत्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. नवीन औषध, रोबोटिक सर्जरी, पीआरपी अशा अनेक नवनवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती या परिषदेत माहिती देण्यात आली. या परिषदेला एआयजी हॉस्पिटल हैदराबाद येथील डॉक्टर श्रद्धा रामचंदानी खत्री यांनी या कॉन्फरन्समध्ये रोबोटिक सर्जरी इन गायनेकोलॉजिस्ट संदर्भात माहिती देताना सांगितले की, रोबोटिक सर्जरीमध्ये पेशंटला खूप अडवांटेज होतात. रोबोटिक सर्जरी म्हणजे लोकांना असं गैरसमज आहे की, सर्जरी रोबोट द्वारे केले जाते. पण असं नसून सर्जरी डॉक्टर द्वारेच केले जाते.
advertisement
सर्जरीद्वारे रोबोटिक सिस्टमचा वापर केला जातो. त्यामुळे ही शस्त्रक्रिया अचूक होते. रोबोटिक सर्जरीद्वारे शस्त्रक्रिया करत असताना असं वाटतंय की पेंटिंग ब्रशने आम्ही पेंटिंग करत आहो. रोबोटिक सर्जरीमध्ये पेशंटचा ब्लडिंग कमी होतो, पेशंटला ब्लड लावावं लागत नाही. त्यामुळे पेशंटची अचूक शस्त्रक्रिया होते. रोपटिक सर्जरी द्वारे शस्त्रक्रिया केल्यावर पेशंटला खूप कमी त्रास होतो. कधी कधी पेशंटला असं वाटतंय की शस्त्रक्रिया झाली का नाही. रोबोटिक पद्धतीने शस्त्रक्रिया केल्यावर पेशंट लवकर घरी जाऊ शकतो व व आपल्या दैनंदिन कामकाजाला लवकर सुरुवात करू शकतो.