TRENDING:

25 हजार कोटींचा घोटाळा! ED ने आरोपपत्र दाखल केल्यावर रोहित पवारांनी ठोकला शड्डू, म्हणाले 'फितुरीला थारा नाही...'

Last Updated:

Rohit Pawar On ED chargesheet : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि काही इतरांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ED Chargesheet Against Rohit Pawar : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) घोटाळा प्रकरणामुळे शरद पवार गटाचे आमदार आणि युवा नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मुंबईतील विशेष न्यायालयात मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्यानुसार आमदार रोहित पवार आणि इतरांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यामुळे आता शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसतीये. अशातच आता रोहित पवार यांनी या प्रकरणात उत्तर दिलंय.
Rohit Pawar On ED Chargesheet File in Maharashtra State Cooperative Bank Scam
Rohit Pawar On ED Chargesheet File in Maharashtra State Cooperative Bank Scam
advertisement

काय म्हणाले रोहित पवार?

कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्याविरोधात ED ने कारवाई केली हे जगजाहीर आहे, याबाबत अधिक सांगण्याची गरज नाही. ED चे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी, त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचं पालन केलं आणि आता आरोपपत्रही दाखल केलं, असं रोहित पवार म्हणाले.

म्हणजेच तपास पूर्ण झाला असून ज्याची आपण वाट बघत होतो त्या निर्णयाचा चेंडू आता न्यायव्यवस्थेच्या कोर्टात आहे. कारण न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास असून यामध्ये ‘दूध दूध आणि पाणी का पाणी’ होईलच, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

advertisement

विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी आहे. महाराष्ट्राने लाचारीला आणि फितुरीला कधीही थारा दिला नाही आणि संघर्षालाच डोक्यावर घेतलंय, हा इतिहास आहे, असंही म्हणत रोहित पवार यांनी शड्डू ठोकलाय.

दरम्यान, आरोपपत्र दाखल होण्यापूर्वी, ईडीने रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीची 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त केली होती. जानेवारी 2023 मध्ये ईडीने रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती अ‍ॅग्रोसह विविध ठिकाणी छापे टाकले होते. ईडीने बारामती अ‍ॅग्रोची 50 कोटी 20 लाखांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली होती. अशातच आता रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
25 हजार कोटींचा घोटाळा! ED ने आरोपपत्र दाखल केल्यावर रोहित पवारांनी ठोकला शड्डू, म्हणाले 'फितुरीला थारा नाही...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल