TRENDING:

अंजली दमानिया यांचे पती सरकारची थिंक टँक 'मित्रा'च्या मानद सल्लागारपदी, रोहित पवारांच्या खोचक शुभेच्छा

Last Updated:

Anjali Damania husband Anish Damania : स्थानिक आणि जागतिक गुंतवणूक आकर्षित करण्यात वित्त क्षेत्रातील अनुभवी अनिश दमानिया यांची भूमिका महत्त्वाची असेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राजकीय पुढाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे असो किंवा विविध सामाजिक विषयांवर आवाज उठवणाऱ्या अंजली दमानिया चर्चेत आल्या आहेत. पण यावेळी निमित्त ठरलेत त्यांचे पती अनिश दमानिया! अनिश दमानिया यांची राज्य सरकारच्या मित्रा या प्रोजेक्टमध्ये मानद सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आल्याची पोस्ट रोहित पवारांनी केली. स्थानिक आणि जागतिक गुंतवणूक आकर्षित करण्यात वित्त क्षेत्रातील अनुभवी अनिश दमानिया यांची भूमिका महत्त्वाची असेल. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी अनिश दमानिया यांना खोचक ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित पवारांच्या ट्विटवर अंजली दमानिया यांनीही उत्तर दिले आहे.
रोहित पवार-अंजली दमानिया
रोहित पवार-अंजली दमानिया
advertisement

रोहित पवार काय म्हणाले?

महाराष्ट्र सरकारची थिंक टँक असलेल्या मित्रा (MITRA) च्या मानद सल्लागारपदी अनिश दमानिया यांची नेमणूक झाल्याबद्दल अभिनंदन..! एकीकडे भ्रष्टाचाराची प्रकरणे काढून अंजली दमानिया ताई ‘सामाजिक’ क्षेत्रात योगदान देत आहेत आता अनिशजी यांचे ‘आर्थिक विकासाच्या’ क्षेत्रात सरकारला मार्गदर्शन लाभणार आहे. दमानिया कुटुंबाचे आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातले एकीकरण निश्चितच महत्वपूर्ण राहील. पुनश्च एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा..! असे रोहित पवार ट्विट करून म्हणाले.

advertisement

अंजली दमानिया यांचे रोहित पवार यांना उत्तर

ह्या ट्विटबद्दल, मला आत्ता काही पत्रकारांचे फोन आले. तो पर्यंत मी हे ट्विट वाचलं नव्हत. रोहित पवारांचे ट्विट खोचक आहे असे पत्रकार म्हणत होते. पण मी ते ट्विट वाचल्यावर मला तितकेस वाईट वाटले नाही. हे तर अपेक्षित होते. अनिश, हा त्याच्या ऑफिसमधील तिसरा असा व्यक्ती आहे, जो FICCI चा सभासद झाला. म्हणून त्याला MITRA वर मानद सल्लागार म्हणून घेतला आहे. ह्या रोलसाठी तो दिड दमडी घेणार नाहीये. त्याला ना राजकारणाशी घेणं देणं, ना सरकार शी. माझ्यासारखं त्यालाही देशाला पुढे नेण्यासाठी आपले योगदान द्यायचं आहे, तो ते ह्या स्वरूपात देतोय.

advertisement

ही बातमी त्याने Linkedin आणि facebook वर स्वतःच शेअर केली, ती मी देखील माझ्या फेसबुकवर शेअर केली. त्यात लपविण्यासारखे काहीच नाही, मला तर त्याचा खूप अभिमान आहे, असे अंजली दमानिया म्हणाल्या.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अंजली दमानिया यांचे पती सरकारची थिंक टँक 'मित्रा'च्या मानद सल्लागारपदी, रोहित पवारांच्या खोचक शुभेच्छा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल