मुंबईमध्ये एकीकडे शपथविधी सोहळा सुरू होता त्यावेळी रोहित पवार हे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीएसओ विदीप जाधव यांच्या तरडगाव येथील निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली. मुंबईत सुनेत्रा पवार यांचं शपथविधी सोहळा संपन्न झाल्यानंतर रोहित पवार यांनी ट्वीट केलं.
"राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून मा. सुनेत्राकाकी यांनी शपथ घेतली, याचा आनंद आहे. खरं म्हणजे मा. अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही पण किमान सुनेत्राकाकींच्या रुपात तरी आम्ही तिथं अजितदादांना पाहू..!
डोक्यावर डोंगराएवढं दुःख असताना आणि आम्ही सर्वजण शोकाकूल असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात, हे कळत नाही.' अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.
सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे सुद्धा बारामतीत होत्या. त्यांनी दुपारी अजित पवार यांच्या काटेवाडीतील निवासस्थानी गेल्या होत्या. अजितदादांच्या मातोश्री आशा पवार यांची भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना सुळे म्हणाल्या की, ' उद्या रविवारी देशाचं आर्थिक बजेट सेशन आहे. त्यामुळे दिल्लीला जाणार आहे, त्यासाठी आशा काकींची परवानगी घ्यायला गेले होते. मी सभागृहाची गटनेते असल्याने दिल्लीला जावं लागणार आहे, असं सांगितलं " अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली.
