अहमदनगर: बारामती लोकसभा मतदारसंघातून जय पवार यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी होत आहे, परंतु यापूर्वीच अजित पवार यांनी इतर मतदारसंघातून चाचणी सुरू केल्याचा रोहित पवार यांनी गौप्यस्फोट केला आहे. त्या चाचणीमध्ये कर्जत जामखेड मतदार संघाचा ही समावेश आहे त्यामुळे विरोधी उमेदवार म्हणून अजित पवार यांचे मी स्वागतच करेल, अशी प्रतिक्रिया कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.
advertisement
'कुणाला तिकीट द्यायचं हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे सुप्रिया ताईंच्या विरोधात सुनेत्रा वहिनींना तिकीट देऊन चूक केली, असं दादा म्हणत आहे आता उद्या जाऊन अजून काही वेगळे करतात का हे पाहावं लागेल, असंही रोहित पवार म्हणाले.
(Maharashtra politics : बारामतीत आणखी एका पवारांची होणार एंट्री, अजितदादा घेणार का एक्झिट?)
'बारामतीचा निर्णय हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. शेवटी मतदार ठरवत असतो. कुणाला निवडून द्यायचे त्यामध्ये एकच आहे. अजितदादा यांनी 200 कोटी रुपये देऊन डिझाईन बॉक्स नावाची संस्था हायर केली आहे. ही संस्था राज्यातील विविध मतदारसंघामधून अजित पवार यांच्यासाठी चाचणी करत आहे. त्यामध्ये कर्जत जामखेड चाही समावेश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात काय होणार हे पहावं लागेल, असा खुलासाही रोहित पवारांनी केला.
(ajit pawar: अजितदादांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीत भूकंप, पवार गटातून आली पहिली प्रतिक्रिया)
'कर्जत जामखेड येथील मतदार संघातील जनतेवर माझा विश्वास आहे. येथील स्थानिक पदाधिकारी विचारांसोबत राहतील असा मला विश्वास आहे. दादांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर बघू अजितदादांनी जर इथून उमेदवारी घोषित केली तर त्यांचे विरोधी उमेदवार म्हणून स्वागत करू, परंतु निवडणुकीत निर्णय हे नागरिक घेत असतात. येणाऱ्या निवडणुकीत अर्थकारण आमच्याकडे कमी असू शकेल इतर शक्ती आमच्याकडे कमी आहेत. गुंडांची ताकद आमच्याकडे कमी आहे. गुंडागर्दी करणारे लोक आमच्या सोबत नाहीत. सभ्य आणि प्रामाणिक लोक आहेत. यादी हे सीट भाजपा रिंग राष्ट्रवादीला हे ठरवू द्या त्यानंतर यावर बोलू, असंही रोहित पवार म्हणाले.
