TRENDING:

चाकणकरांकडून महिला डॉक्टरचं चारित्र्य हनन? विरोधकांचा भूमिकेवर सवाल; प्रकरणाला वेगळं वळण

Last Updated:

चाकणकर यांनी ज्या प्रकारे या प्रकरणाचा निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केला त्यावरून संताप व्यक्त केला जातोय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सातारा :  साताऱ्यातील महिला डॉक्टराच्या आत्महत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र तिच्या न्यायाची मागणी करतोय. पण ज्यांनी महिलांच्या न्यायासाठी आवाज उठवावा त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा मात्र पीडितेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताहेत का असा प्रश्न विचारला जातोय. चाकणकर यांनी ज्या प्रकारे या प्रकरणाचा निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केला त्यावरून संताप व्यक्त केला जातोय. प्रकरणाचा तपास सुरू असताना तपासातला काही भाग जाहीर करण्या मागचा त्यांचा हेतू काय असा प्रश्न विचारला जातोय.
News18
News18
advertisement

चाकणकरांनी केलेल्या या दाव्यावरून आता नव्या वादाची ठिणगी पडलीय. शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून डॉक्टर तरुणीनं ते टोकाचं पाऊल उचललं. ती एका व्यवस्थेची बळी ठरली. पण असं असताना त्या तरुणीला न्याय मिळून देण्याऐवजी तिला एक प्रकारे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न केला जात नाही ना? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.

advertisement

डॉक्टर तरुणी पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकरच्या संपर्कात होती. त्यांच्यात फोनवरून चॅट झाल्याचा दावा महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केला. ही माहिती देण्यामागे त्यांचा उद्देश काय होता असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.महिला आयोग बदनामी करत नसतो कोणत्या महिलेची मुख्यमंत्र्यांची मेहेरनजर व्हावी यासाठी खटाटोप आहे.

आयोगाकडून चारित्र्यहनन का? 

फलटणधील डॉक्टर तरुणीनं आत्महत्येपूर्वी आपल्या तळहातावर आत्महत्येचं कारण लिहून ठेवलं होतं. पीएसआय गोपाळ बदनेनं चार वेळा बलात्कार केल्याचं त्यात उल्लेख आहे. तर प्रशांत बनकरनं मानसिक छळ केल्याचं तरुणीच्या हातावरील मजकुरात आढळून आलंय. या दाव्यानंतर विरोधकांनी चाकणकरांवर सडकून टीका केलीय. तसेच महिला आयोग्याध्यक्षांच्या या प्रकरणातील भूमिकेवरचं सवाल उपस्थित केलाय. मृत्यूनंतर त्या मुलीचं आयोगाकडून चारित्र्यहनन का ?पोलीस यंत्रणेवर संशय असताना त्यांनी दिलेले पुरावे का ग्राह्य धरावेत ? असा सवाल उपस्थित होत आहे.

advertisement

चाकणकरांच्या भूमिकेवर सवाल 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

पोलीस आणि राजकारण्यांकडून दबाव टाकला जात असल्याचं डॉक्टर तरुणीच्या लेखी तक्रारीतून समोर आलं आहे. पण तिचा तो मुद्दाही चाकणकरांनी खोडून काढला.तर दुसरीकडे चाकणकरांच्या या पत्रकार परिषदेवरच सुषमा अंधारेंनी जोरदार आक्षेप घेतला आहे.  महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना यापूर्वीही टीकेचं धनी व्हावं लागलं आहे. वैष्णवी हगवणे, तनिषा भिसे प्रकरणातही विरोधकांनी त्यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला होता. आता फलटण प्रकरणातही त्या विरोधकांच्या निशाण्यावर आल्या आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
चाकणकरांकडून महिला डॉक्टरचं चारित्र्य हनन? विरोधकांचा भूमिकेवर सवाल; प्रकरणाला वेगळं वळण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल