पुण्यात अजित पवार यांची राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असे द्वंद सुरू आहे. पुण्यामध्ये हिंदू आणि मुस्लीम अत्यंत गुण्यागोविंदाने राहत असताना हिंदू- मुस्लीम वाद करून शांतता भंग करणाऱ्या कुलकर्णी यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी, असे रुपाली ठोंबरे म्हणाल्या.
रुपाली ठोंबरे यांनी मेधा कुलकर्णी यांना सुनावले
आज पुन्हा एकदा मेधा कुलकर्णी यांनी शनिवार वाड्यामध्ये जाऊन जी नाटकी केली आहेत त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. पुण्यातील सामाजिक वातावरण बिघडवणं आणि सामाजिक तेढ निर्माण करणं यासाठी त्यांना जबाबदार धरले पाहिजे. शनिवार वाडा हा पेशव्यांचा आहे आणि पेशवे शिवाजी महाराजांचेच होते आणि शिवाजी महाराजांनी कधी जातपात मानली नाही. या खासदार बाईंच्या या कृत्याला लवकरच आळा घातला पाहिजे. भाजपने त्यांना आवरले पाहिजे. आमच्या पुण्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम अत्यंत गुण्यागोविंदाने राहतात, असे ठोंबरे म्हणाल्या.
advertisement
मुस्लीम मुली नमाज पठण करत असल्याचा दावा करणारी चित्रफित
दुसरीकडे मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाड्यात मुस्लीम मुली नमाज पठण करत असल्याचा दावा करणारी चित्रफित आपल्या समाज माध्यमांवर प्रसिद्ध केली. त्यांच्या एक्सवरील पोस्ट नंतर ऐन दिवाळीत पुण्यातील वातावरण चांगलेच तापले. मेधा कुलकर्णी यांच्या या पोस्टनंतर समाज माध्यमांवर चित्रफित वेगाने पसरली झाली असून, चित्रफित नेमकी कधी चित्रित केली याबद्दलची माहिती समोर येऊ शकलेली नाही. किंबहुना पोलिसांकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
शनिवारवाड्यात गोमुत्र शिंपडले
शनिवार वाड्यात कोणाची ही पीर किंवा कबर नसल्याचे हिंदू संघटनांचे म्हणणे आहे. याठिकाणी असलेला पीराचा बोर्ड काढून टाका, अशी मागणी हिंदू संघटनांनी केली. मेधा कुलकर्णी यांच्याकडून प्रशासनाला ८ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. आंदोलनावेळी शनिवारवाड्यात गोमुत्र शिंपडण्यात आले.