TRENDING:

सामनाची आग थांबवावी लागेल, अग्रलेखामुळे भाजप आक्रमक; बावनकुळेंनी दिला इशारा

Last Updated:

सामानाची आग थांबवावी लागेल त्याचा विचार आम्ही करू, ते खपवुन घेणार नाही. रस्त्यावर आणि न्यायालयीन लढाई लढणार आहे असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी इशारा दिलाय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नागपूर, 19 ऑगस्ट : शिवसेनेचं मुखपत्र सामना वृत्तपत्रातून केल्या जाणाऱ्या टीकेवरून आता भाजप आक्रमक झाले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं की, सामनाची आग थांबवावी लागेल. वृत्तपत्रात बोलण्याचीही मर्यादा असते. आम्ही हे खपवून घेणार नाही. रस्त्यावर आणि न्यायालयीन लढणार आहे. आमचे मुंबईतील नेते, पदाधिकारी सामना या वृत्तपत्राविरोधात आक्रमक पवित्र्यात आहेत. आंदोलनाची स्थिती निर्माण होऊ शकते असंही बावनकुळे यांनी सांगितलं.
News18
News18
advertisement

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे बावचळले आहेत. त्यांचं डोकं काम करत नाही आहे. पुन्हा सत्तेत येण्याची संधी नाही. पक्ष गेला चिन्ह गेला, राष्ट्रवादी भाजपसोबत आली आहेय, पुन्हा कधी सत्तेत येऊ शकत नाही हे दुःख उद्धव ठाकरे यांना आहे. हे दुःख सामन्यातून मांडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसून चूक केली ती आता यांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे मुखपत्रातून अशा पद्धतीने टीका करत आहे.

advertisement

Sangli : सरकारी कर्मचाऱ्यांचा अनागोंदी कारभार, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची दोघांना थप्पड

सामना वृत्तपत्राची आम्ही तक्रार करणार आहोत. वृत्तपत्रात सुद्धा बोलण्याची लिहिण्याची लिमिट आहे. आमचे मुंबईचे नेते पदाधिकारी सामना या वृत्तपत्राविरोधात आंदोलनात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते. सामानाची आग थांबवावी लागेल त्याचा विचार आम्ही करू, ते खपवुन घेणार नाही. रस्त्यावर आणि न्यायालयीन लढाई लढणार आहे,  वैयक्तिक टीका करण्याचा अधिकार त्यांना नाही असंही बावनकुळे यांनी म्हटलं.

advertisement

राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून अनेकदा ते पदावरून दूर होणार असल्याच्या चर्चा होत आहेत. यावर बोलताना बावनकुळे यांनी म्हटलं की,  '2024 पर्यंत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार आहे आणि त्यांच्याच नेतृत्वात निवडणुका अजित दादा सोबत आम्ही लढणार आहोत. विरोधी पक्ष नेते म्हणून काही बोलावं लागतं म्हणून वडेट्टीवार बोलतात. 200 च्या वर बहुमत असलेले आमचं सरकार आहे. आमच्या नेतृत्वाने हे स्पष्ट केलेला आहे. त्यामुळे विरोधकांचे स्वप्न साकार होणार नाही.' येत्या १०-१५ दिवसात मुख्य खुर्ची बदलेल असं वक्तव्य विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं.

advertisement

आम्ही तिन्ही पक्ष एकमेकाला ताकद देण्याचे काम करणार आहोत. पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात क्रमांक एक वर आणण्यासाठी प्रचंड ताकतीने पुढच्या काळात महायुतीला प्रचंड मदत मिळावी म्हणून आमचं काम सुरू झाल आहे. २८८ मतदारसंघात दौऱा केला जाणार असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गजाआडही खुलली कला! कैद्यांनी कारागृहात बसून काढली चित्रं, इथं भरलंय प्रदर्शन
सर्व पहा

आमचा संघटनात्मक प्रवास आहे महा विजय 2024 चा हा प्रवास आहे प्रत्येक मतदारसंघात 50000 घरी जाऊन दररोज अभियान राबवलं जाणार आहे, 600 कार्यकर्ते एका लोकसभा मतदार संघात घर चलो अभियान राबनवणार आहे. लेखाजोखा आम्ही मांडणार आहे. 2024 मध्ये नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होईल. 51 टक्के मत महराष्ट्रात मिळेल. लोकांमध्य उत्साह असून त्यांच्यावर विश्वास असल्याचं चंद्रशेखर बावनकुले यांनी म्हटलं.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सामनाची आग थांबवावी लागेल, अग्रलेखामुळे भाजप आक्रमक; बावनकुळेंनी दिला इशारा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल