Sangli : सरकारी कर्मचाऱ्यांचा अनागोंदी कारभार, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची दोघांना थप्पड

Last Updated:

सरकारी कागदपत्रे बोगस लोकांच्या हातात दिल्याने बाळू लोखंडे या बोगस व्यक्तीलाही माने यांनी थोबाडीत लगावली.

News18
News18
असिफ मुर्सल, सांगली, 19 ऑगस्ट : भूमी अभिलेख कार्यालयात बोगस लोक काम करत असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार समोर आला आहे. सरकारी कागदपत्रे बोगस लोकांच्या हातात दिली असून भूमी अभिलेख कार्यालयात अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला. तासगाममध्ये ठाकरे गटाच्या शिवसेना तालुका प्रमुखाने भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांवर संताप व्यक्त केला.
तासगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयात अनेक बोगस लोक काम करतात. ही लोकं सरकारी कागदपत्रे हाताळतात. सामान्य लोकांना लुबाडतात. याच मुद्द्यावरून आक्रमक झालेले शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख प्रदीप माने यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक चंद्रकांत शिरढोणे यांच्या कानशिलात लगावली.
advertisement
सरकारी कागदपत्रे बोगस लोकांच्या हातात दिल्याने बाळू लोखंडे या बोगस व्यक्तीलाही माने यांनी थोबाडीत लगावली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. दरम्यान, तासगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत तरी याबाबतची कोणतीही नोंद झाली नव्हती. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या कानशिलात लगावल्याच्या घटनेची चर्चा जोरदार सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/सांगली/
Sangli : सरकारी कर्मचाऱ्यांचा अनागोंदी कारभार, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची दोघांना थप्पड
Next Article
advertisement
Sanjay Raut: महिनाभरानंतर समोर आले, संजय राऊत आजारपणाबद्दल पहिल्यांदाच बोलले, ''याची लागण मला...''
महिनाभरानंतर समोर आले, संजय राऊत आजारपणाबद्दल पहिल्यांदाच बोलले, ''याची लागण मला
  • महिनाभरानंतर समोर आले, संजय राऊत आजारपणाबद्दल पहिल्यांदाच बोलले, ''याची लागण मला

  • महिनाभरानंतर समोर आले, संजय राऊत आजारपणाबद्दल पहिल्यांदाच बोलले, ''याची लागण मला

  • महिनाभरानंतर समोर आले, संजय राऊत आजारपणाबद्दल पहिल्यांदाच बोलले, ''याची लागण मला

View All
advertisement