Solapur : जिल्हाधिकारी वरिष्ठांना गिफ्ट देणार आहेत, दागिणे घेऊन या; सोलापुरात सराफाची फसवणूक
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
मी जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाचा चालक असल्याचे सांगून सराफाला सव्वा सहा तोळ्याला फसवले.
प्रीतम पंडित, सोलापूर, 19 ऑगस्ट : जिल्हाधिकाऱ्याचा ड्रायव्हर असल्याचं सांगत सराफाचे सहा तोळे सोने लाटल्याची घटना सोलापूरमध्ये घडली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकारी भेटायला आलेत. त्यांना सोन्याचे दागिने भेट द्यायचे आहेत असं सांगून सराफाकडून सोने घेतले आणि आरोपी पसार झाला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच सराफाने पोलिसात तक्रार दाखल दिलीय. दरम्यान, सराफ दुकानातील सीसीटीव्हीमध्ये संबंधित व्यक्ती दिसून आला आहे.
सोलापूरचे नवीन जिल्हाधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकारी भेटायला आले आहेत. त्यांना सोन्याच्या लॉकेट, चैन भेट घ्यायच्या आहेत असं म्हणत मी जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाचा चालक असल्याचे सांगून सराफाला सव्वा सहा तोळ्याला फसवले. विजापूर नाका येथे आयाज मुल्ला यांचे सराफी दुकान आहे. गुरुवारी सराफ दुकानात एक व्यक्ती आला आणि तो म्हणाला मी संदीप वाघमारे, जिल्हाधिकाऱ्यांचा चालक आहे. जिल्हाधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकारी भेटायला आले आहेत. त्यांना जिल्हाधिकारी सोन्याच्या अंगठ्या लॉकेट घालणार असल्याची बतावणी व्यक्तीने केली.
advertisement
संबंधित व्यक्तीने सराफ मुल्ला यांना जिल्हाधिकारी कार्यालयात नेले. त्या ठिकाणी वेटिंग रूम मध्ये बसवले. जिल्हाधिकाऱ्यांसोबत मीटिंग चालू असल्याचे सराफ मुल्ला यांना सांगितले. त्यामुळे तुम्ही लॉकेट अंगठी घेऊन या असा निरोप सदर व्यक्तींनी मुल्ला सांगितला. त्यानंतर मुल्ला यांनी आपल्या दुकानात जाऊन अंगठी, लॉकेट घेऊन जिल्हाधिकार्यालयात आले त्या ठिकाणी तोतया व्यक्तीला अंगठी लॉकेट दिली सराफ मुल्ला यांना त्या ठिकाणी थांबण्यास सांगितले मात्र बराच वेळ गेल्यानंतर तो येत नसल्यामुळे त्यांनी चौकशी केली असा कोणताही व्यक्ती नसल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.. सराफ मुल्ला यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी विजापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली...
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 19, 2023 11:18 AM IST
मराठी बातम्या/सोलापूर/
Solapur : जिल्हाधिकारी वरिष्ठांना गिफ्ट देणार आहेत, दागिणे घेऊन या; सोलापुरात सराफाची फसवणूक


