शरद जोशींनी ज्या विचारांची पेरणी केली तो पुढे घेऊन जाण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही. आम्हाला पदे मिळाली पण आम्ही विचारांशी फारकत घेतली नाही. निश्चितपणे आम्ही शेतकऱ्यांचा विचार घेऊन जाऊ. काही लोकांना वाटत की माझ्यामुळे सगळे आहे, ढगफुटी माझ्यामुळे झाली. पण सर्वांमुळे सर्व असते हे त्यांना ठाऊक नाही. अनेकांनी चळवळीत जीव ओवाळून टाकला, केसेस घेतल्या, त्यांच्या रक्तातून चळवळ उभी राहिली, असे खोत म्हणाले.
advertisement
शेतकरी चळवळीशी प्रामाणिक आहे
सदाभाऊला पद मिळाले म्हणून बाजूला झाला, असे काहींना वाटते. पण मी शेतकरी चळवळीशी प्रामाणिक आहे. पद मिळवायचे असते तर सदाभाऊंनी बरंच काही केले असते. मुंडे साहेबांच्या घरात बसलो, त्यावेळी माढ्यातून लोकसभेची ऑफर आली होती. त्याचवेळी कमळ हातात घेतले असते तर आज माढ्यातून खासदार असतो, पण संघटनेकडून त्यावेळी लढलो. आम्ही चळवळ आणि कार्यकर्त्यां जपण्याचा प्रयत्न केला, असे खोत म्हणाले.
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री समज दिली पण सदाभाऊ खोत कृषिमंत्र्यांवर खूश
माणिकराव कोकाटे हे आतापर्यंतचे सर्वात संवेदनशील कृषिमंत्री आहेत. इंडिया नव्हे तर भारतातले कृषिमंत्री असल्याने माणिकराव कोकाटे हे रांगडी भाषेत बोलतात. त्यांना शेतकरी प्रश्नांची जाण आहे, असे सदाभाऊ म्हणाले. शेतकरी आणि सरकारमधील नेत्यांकडून कोकाटे यांच्यावर टीका केली जात असताना सदाभाऊ खोत यांनी मात्र कोकाटे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.