सांगली शहरातील माळी गल्ली या ठिकाणी हा प्रकार घ़डला असल्याचे समोर आले. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे समोर आले आहे. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एका धारकऱ्याच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आटपून भिडे गुरुजी आपल्या घरी जात होते. त्याच वेळी भिडे गुरुजींवर कुत्र्यांनी अचानकपणे हल्ला केला. कुत्र्याने भिडे गुरुजींच्या पायाचा चावा घेतला.
advertisement
या घटनेनंतर संभाजी भिडे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. कुत्र्याने केलेल्या हल्ल्यानंतर धारकऱ्यांमध्ये चितेंचे वातावरण पसरले.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
April 15, 2025 9:18 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sambhaji Bhide : धारकऱ्याकडे रात्री जेवण केलं, घरी जाताना भिडे गुरुजींसोबत घडला अनर्थ, आता प्रकृती कशी?
