TRENDING:

वाळू माफियांचे धाबे दणाणले, महसूलमंत्र्यांचा नवा आदेश; वाहनांचे परमीट आता जागेवरच रद्द

Last Updated:

महसूल मंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार, अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाच्या मदतीने आता कडक धोरण अवलंबण्यात आले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : गेल्या काही वर्षांत अवैध गौणखनिज वाहतुकीची अनेक प्रकरणे राज्यात उघडकीस आली. धक्कादायक बाब म्हणजे महसूलच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यापर्यंत वाळूमाफियांची मजल पोहोचली आहे. तर दुसरीकडे वाळूमाफिया प्रशासकीय कर्मचारी-अधिकारी यांसह स्थानिक राजकीय नेत्यांना हाताशी धरून राजरोसपणे वाळूविक्री करत आहेत.पण आता वाळूमाफियांनं धडा शिकवण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कडक आदेश दिले आहेत. अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परमीट आता जागेवरच रद्द करण्यात येणार आहे. महसूल विभागाने यासंदर्भातील परिपत्रक जारी केले.
News18
News18
advertisement

राज्यात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वाळू आणि इतर गौण खनिजांच्या चोरीमुळे शासनाच्या महसुलाची आणि पर्यावरणाची मोठी हानी तर होतेच, सोबतच या अवैध व्यवसायातून गुन्हेगारी वाढत असून, कारवाईसाठी जाणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार, अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाच्या मदतीने आता कडक धोरण अवलंबण्यात आले आहे.

advertisement

* राज्य परिवहन प्राधिकरणाने निश्चित केलेल्या नवीन निर्देशानुसार, अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम ८६ अंतर्गत खालीलप्रमाणे कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत:

• पहिला गुन्हा : ३० दिवसांसाठी परवाना (परमिट) निलंबित करणे आणि वाहन अटकावून ठेवणे.

• दुसरा गुन्हा : ६० दिवसांसाठी परवाना निलंबित करणे आणि वाहन अडकावून ठेवणे.

advertisement

• तिसरा गुन्हा : संबंधित वाहनाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करणे आणि प्रादेशिक परिवहन प्राधिकरणामार्फत पुढील कारवाईसाठी वाहन जप्त करणे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

राज्यात होणाऱ्या वाळू आणि इतर गौण खनिजांच्या चोरीमुळे शासनाच्या महसुलाची आणि पर्यावरणाची मोठी हानी तर होतेच, सोबतच या अवैध व्यवसायातून गुन्हेगारी वाढत असून, कारवाईसाठी जाणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार, अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाच्या मदतीने आता कडक धोरण अवलंबण्यात आले आहे

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वाळू माफियांचे धाबे दणाणले, महसूलमंत्र्यांचा नवा आदेश; वाहनांचे परमीट आता जागेवरच रद्द
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल