Baramati Lok Sabha Result 2024 : अजितदादांना धक्का! पवार ठरले भारी, सुप्रिया सुळेंची जोरदार आघाडी
लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरून सुरूवातीपासूनच महाविकास आघाडीमध्ये वाद झाल्याचं दिसून आलं. सांगलीच्या काँग्रेस नेत्यांनी सुरुवातीपासूनच शिवसेनेला विरोध केला आणि ही जागा आपल्यालाच मिळावी यासाठी प्रयत्न केले. पण शेवटपर्यंत त्यांना यश आलं नाही. काँग्रेसला कोल्हापूरची जागा सोडली म्हणून सांगलीत शिवसेना ठाकरे गटाने आपला उमेदवार दिला. शिवसेना ठाकरे गटाने या जागेवर चंद्रहार पाटलांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे काँग्रेस नाराज झाली. तर काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.
advertisement
सांगलीच्या जागेवरून झालेला महाविकास आघाडीतील वाद दिल्ली हायकमांडपर्यंतही पोहोचला होता. विशाल पाटील हे जरी अपक्ष उभे राहिले तरी त्यांच्यामागे जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांची छुपी ताकद असल्याचं दिसून आलं. सुरूवातीला काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनीही विशाल पाटलांना थेट साथ दिली. सांगलीच्या जागेवरून एवढा वाद झाल्यानंतरही काँग्रेसने विशाल पाटलांवर कारवाई केली नाही, त्यामुळेही अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. तर सांगलीचं मतदान झाल्यानंतर तिथले स्थानिक काँग्रेस नेते आणि विशाल पाटील एकत्र दिसले होते.