खरं तर मंगळवारी 21 तारखेला पहाटेच्या सुमारास विश्रामबाग चौकातून अज्ञातांनी राजस्थानमधून सांगलीत येऊन फुगे विक्री करत आपले उदरनिर्वाह चालविणाऱ्या कुटुंबियांचा एक वर्षाच्या साहिलचे अज्ञातांनी अपहरण केले होते. पहाटेपर्यंत साहिल न सापडल्याने त्याच्या पालकांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती.या तक्रारीनुसार विश्रामबाग आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक साहिलच्या शोधासाठी विविध ठिकाणी पाठवली होती. पण शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने साहिलचा शोध घेण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या. तर दुसरीकडे लक्ष्मीपूजन असल्याने व्यापाऱ्यांनीही तातडीने मदत करण्यास नकार दिला होता. तरीही पोलिसांनी त्यांचे प्रयत्न सुरूच ठेवले.पण तरीही पोलिसांच्या हाती कोणताच सुगावा लागत नव्हता.
advertisement
अखेर एलसीबीकडील संदीप नलवडे, आमिरशा फकीर यांना इनायत गोलंदाज तसेच पठाण दाम्पत्याने साहिलचे अपहरण केल्याची माहिती एका गुप्त खबऱ्याद्वारे मिळाली होता. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने तातडीने मिरजेतून इनायत याला ताब्यात घेतले.त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने पठाण दाम्पत्याने साहिलचे अपहरण केल्याची कबुली दिली. तसेच इनायतने स्वतः रत्नागिरी जिल्ह्यातील राजेशिर्के यांना मूलबाळ नसल्याने त्यांच्याकडे साहिलला दिल्याचीही कबुली दिली.त्यानंतर पथकाने तातडीने सावर्डे येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने साहिलला ताब्यात घेतले.तब्बल चार दिवसानंतर साहिल आईच्या कुशीत विसावल्यानंतर पोलीस पथकाने सुटकेचा निःश्वास सोडला होता.आईच्या कुशीत विसावलेल्या साहिलला पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मिठाई चारून आनंद व्यक्त केला. तर बागरी दाम्पत्याच्या चेहऱ्यावरील आनंद पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना दिसत होता.
साहिल याला रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथून शोधून काढण्यात आले. याप्रकरणी मिरजेतील एकाला अटक करण्यात आली असून या अपहरणाचे मुख्य सूत्रधार असलेले दाम्पत्य पसार झाले आहे. त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली. इनायत अब्दुलसत्तार गोलंदाज (वय ४३, रा. किल्ला भाग, मिरज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर इम्तियाज पठाण आणि वसीमा इम्तियाज पठाण हे पसार झाले आहेत.
