सांगली महापालिका निवडणुकीमध्ये शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्याचा उमेदवारी अर्ज अखेर मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून संभाजी भिडे यांची मनधरणी करण्यात आली आहे. शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते राहुल बोळाज यांनी प्रभाग 14 मधून यांनी संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
भाजपाने उमेदवारी नाकारल्यानंतर बोळाज यांनी शक्तिप्रदर्शन करत अपक्ष अर्ज दाखल केला होता. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यांची समजूत काढली. अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं झाल्यामुळे संभाजी भिडे आणि राहुल बोळाज याची मनधरणी करण्यात यश आलं आहे.
advertisement
...म्हणून राहुल बोळाज यांनी भरला होता उमेदवारी अर्ज
विशेष म्हणजे, शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते राहुल बोळाज यांनी आपल्याला भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. पण, भाजपकडून उमेदवारी देण्यात न आल्यामुळे त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. ' पक्षाने आमच्या कार्याची दखल घेतली नाही, तरीसुद्धा हिंदुत्वाचा आवाज बुलंद ठेवण्यासाठी आम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी हे कोणत्याही राजकीय सौदेबाजीपेक्षा विचारधारेला प्राधान्य देतात, असं म्हणत बोळाज यांनी आपली जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्याने उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे सांगलीत भाजपसमोर मोठं आव्हान उभं ठाकलं होतं. पण, अखेरीस खुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली, त्यामुळे तुर्तास भाजपपुढील अडचण आता दूर झाली आहे.
