TRENDING:

येलूरच्या शफी भैय्यांची मोफत रिक्षासवारी, 9 वर्षांची अनोखी परंपरा, जिथे हिंदू मुस्लीम एकतेचे होते दर्शन! VIDEO

Last Updated:

येलूर गावापासून गणपती मूर्ती बनवण्याचा कारखाना दीड किलोमीटर दूर आहे. शिवाय गावात जाण्यासाठी दळणवळणाची साधनेही कमी आहेत. यामुळे गणेश भक्तांची गैरसोय होते. ही गैरसोय लक्षात घेऊन येलूर गावातील रिक्षा व्यावसायिक शफी मुलाणी यांनी एक उपक्रम राबविला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रीती निकम, प्रतिनिधी
advertisement

सांगली : सर्वत्र लाडक्या गणरायाचे उत्साहात आगमन झाले आहे. अनेक ठिकाणी या गणेशोत्सवाच्या निमित्ताने हिंदू मुस्लीम एकतेचेही दर्शन होते. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील येलूर गावातील हिंदू-मुस्लिम एकता कायम ठेवणारा एक अनोखा भक्तीभाव दिसून येतो. आज याचबाबत आपण जाणून घेणार आहोत.

येलूर गावापासून गणपती मूर्ती बनवण्याचा कारखाना दीड किलोमीटर दूर आहे. शिवाय गावात जाण्यासाठी दळणवळणाची साधनेही कमी आहेत. यामुळे गणेश भक्तांची गैरसोय होते. ही गैरसोय लक्षात घेऊन येलूर गावातील रिक्षा व्यावसायिक शफी मुलाणी यांनी एक उपक्रम राबविला आहे. गणपती आगमनाच्या दिवशी शफी मुलाणी हे मोफत रिक्षा सवारी करून घरोघरी बाप्पाच्या मूर्ती पोहोच करतात. दरवर्षी 70 हून अधिक मूर्ती पोहोच करत शफी मुलाणी यांनी मागील 9 वर्षांपासून हा अनोखा भक्ती भाव जपला आहे.

advertisement

गणेशोत्सवात घरी बनवा कोकणातील प्रसिद्ध गोड गुलगुले, चव भारी, रेसिपीही अगदीच सोपी, VIDEO

वयाच्या 8 व्या वर्षीपासून घरी गणपती बसवतो -

लोकल18 शी बोलताना येलूर येथील रिक्षा व्यावसायिक शफी मुलाणी यांनी सांगितले की, "मी लहानपणापासून हिंदू मुस्लिम ऐक्याच्या वातावरणात वाढल्याने माझ्या मनी दोन्ही धर्मातील सण-उत्सवांविषयी आदर आहे. मी वयाच्या 8 व्या वर्षीपासून घरी गणपती बसवतो. तसेच मी दोन सार्वजनिक गणेश मंडळांचा सदस्य देखील आहे. आमचे गाव लहान खेडे असल्याने इथे दळणवळणाची साधने कमी आहेत. यामुळे गणपती आगमनादिवशी लोकांची गैरसोय होते. अशावेळी गणेश भक्तांना बाप्पाच्या मूर्ती आपल्या घरी आनंदाने पोहोचाव्यात यासाठी मी माझा रिक्षा व्यवसायाचा एक दिवस बाप्पा चरणी अर्पण करू शकतो, या विचारातून मी गेल्या 9 वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहे. यापुढेही गणपती आगमना दिवशी बाप्पाच्या मुर्ती घरोघरी पोहोचवण्याचे हे काम असेच मोफत चालू ठेवण्याची माझी इच्छा आहे," या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

advertisement

Kolhapur : मानाचा प्रथम गणपती! जिवंत वाघ अन् अस्वल आणण्यापासून ते समाजप्रबोधन, 150 वर्षांची अनोखी परंपरा, VIDEO

हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या वातावरणात वाढल्याने शफी मुलाणी यांच्या मनी लहानपणापासूनच गणेश भक्ती रुजली आहे. ते मुस्लिम धर्मासह हिंदू धर्मातील सण-उत्सव आनंदाने साजरे करतात. गावातील ज्ञानेश्वरी पारायण सोहळा असो किंवा समाजातील कोणासही मदतीची गरज असो प्रत्येकाचा हाकेला धावून जात येलूरच्या शफी भैय्यांनी सामाजिक ऐक्य जपल्याचे गावकरी सांगतात. शफी मुलाणी यांच्या गणेशभक्ती आणि मोफत रिक्षा सवारीमुळे येलूरच्या हिंदू-मुस्लिम एकतेची आज सर्वत्र चर्चा होत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
येलूरच्या शफी भैय्यांची मोफत रिक्षासवारी, 9 वर्षांची अनोखी परंपरा, जिथे हिंदू मुस्लीम एकतेचे होते दर्शन! VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल