ईश्वरपूरच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आनंदराव मलगुंडे विजयी झाले असून भाजपचे विश्वनाथ डांगे पराभूत झाले आहेत. ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीत 30 जागेपैकी 22 जागेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाने बाजी मारली असून भाजपला कवळ तीन जागेवर समाधान मानावं लागलं.
राष्ट्रवादी अजित पवार गटाला तीन जागा तर शिवसेनेला दोन जागेवर समाधान मानावं लागलं. या मतदारसंघात खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली होती. तर चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवस इथं तळ ठोकला होता.
advertisement
ईश्वरपूरच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे यांनी भाजपचे विश्वनाथ डांगे यांचा सुमारे 7 हजार मतांनी पराभव करत दुसऱ्यांदा नगराध्यक्ष पद मिळवलं आहे. त्यामुळे भाजपचे नेते विक्रम पाटील यांना मोठा धक्का बसल्याचं म्हटलं जातंय.
अशातच आता शहरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांचा जयजयकार केला अन् एकच जल्लोष केल्याचं पहायला मिळालं.
सांगली जिल्हा 6 नगर परिषद / 2 नगरपंचायत
1 ) ईश्वरपूर नगरपरिषद राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आनंदराव मलगुंडे विजय
2 ) आष्टा नगरपरिषद राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विशाल शिंदे विजयी
3 ) तासगाव नगरपरिषद स्वाभिमानी विकास आघाडीच्या विजया सावंत विजयी
4 ) पलूस नगरपरिषद काँग्रेसच्या संजीवनी पूदाले विजयी
5 ) विटा नगरपरिषद शिवसेना शिंदे गटाचे काजल म्हेत्रे विजयी
6 ) जत नगरपरिषद भाजपाचे रवींद्र आरळी विजयी.
7) आटपाडी नगरपंचायत भाजपाचे उत्तम जाधव विजयी
8 ) शिराळा नगरपंचायत शिवसेना शिंदे गटाचे पृथ्वीसिंग नाईक विजयी.
