महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य
राज्यात गेल्या काही महिन्यांत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शालेय मुली, महाविद्यालयीन युवतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. बसस्थानक परिसरात आणि बसमध्ये मुलींची छेडछाड होण्याचे प्रकार घडत होते. अनेक मुली हा त्रास सहन करतच शिक्षण घेत होत्या. पण, आता राज्यातील काही घटनांनंतर मुलींच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे.
शिक्षणाला प्रोत्साहन आणि पालकांना दिलासा
advertisement
महिला वाहकांच्या नियुक्तीमुळे ग्रामीण भागातून शहरात शाळा-कॉलेजसाठी येणाऱ्या मुली-युवतींना एक विश्वास मिळाला आहे. यामुळे पालकही आता बिनधास्तपणे आपल्या मुलींना शिक्षणासाठी बाहेर पाठवत आहेत.
- कधीपासून बससेवा? : 'गाव ते शाळा' बससेवा 2012 पासून सुरू आहे.
- जिल्ह्यात हजारो विद्यार्थिनी : जिल्ह्यातील दहा एसटी आगारांतून हजारो विद्यार्थिनी या बससेवेचा लाभ घेतात.
- 171 महिला वाहक : जिल्ह्यातील दहा एसटी आगारांत 171 महिला वाहक कार्यरत आहेत.
- मोफत प्रवास : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेंतर्गत 12 वीपर्यंतच्या मुलींना मोफत बसपास दिला जातो.
'पोलीस काका/पोलीस दीदी' संकल्पना
मुलींच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक शाळेत 'पोलीस काका/पोलीस दीदी' ही संकल्पना राबवली जात आहे. पोलीस अधिकारी अधून-मधून बसमधून प्रवास करतात, ज्यामुळे मुलींना दिलासा मिळतो आणि टवाळखोरांना आळा बसतो.
हे ही वाचा : पाणीसाठा पुरेसा, चिंता मिटली! वारणा धरणाचे दरवाजे बंद, 83% पाणीसाठा; 50% पेरण्या पूर्ण
हे ही वाचा : रक्षाबंधन स्पेशल : मुंबई-कोल्हापूर दरम्यान सांगलीमार्गे विशेष रेल्वे, आजपासून आरक्षण सुरू
