रक्षाबंधन स्पेशल : मुंबई-कोल्हापूर दरम्यान सांगलीमार्गे विशेष रेल्वे, आजपासून आरक्षण सुरू
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने मुंबई-कोल्हापूर-मुंबई मार्गावर विशेष एक्सप्रेस गाड्या सुरू केल्या आहेत. या...
सांगली : रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दीड सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेने बुधवारी प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर सांगली आणि किर्लोस्करवाडीमार्गे विशेष एक्सप्रेस गाड्यांना हिरवा कंदील दाखविला आहे.
या विशेष गाड्या सांगली जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरणार असून मुंबई आणि कोल्हापूरमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या विशेष गाड्यांचे आरक्षण 7 ऑगस्टपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि 'आयआरसीटीसी' या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी केले आहे. या विशेष गाड्यांचा लाभ घेणाऱ्या सांगलीकरांनी जाताना व येताना तिकिटावर सांगली स्थानकाचा उल्लेख करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
advertisement
अशी आहे गाडीची रचना
एसी-3 टियर डबे - 2
स्लीपर डबे - 12
जनरल सेकंड क्लास - 8
सेकंड सीटींग कम गार्ड ब्रेक व्हॅन - 2
अशा धावणार विशेष गाड्या
मुंबई सीएसएमटी ते कोल्हापूर (गाडी क्र. 01417) : ही विशेष गाडी दि. 8 ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजता मुंबई सीएसएमटीहून निघेल. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता सांगली स्थानकावर येईल. 8.10 वाजता कोल्हापूरसाठी रवाना होऊन 10.15 वाजता पोहोचेल.
advertisement
कोल्हापूर ते मुंबई सीएसएमटी (गाडी क्र. 01418) : ही विशेष गाडी दि. 10 ऑगस्ट रोजी दुपारी 4.40 वाजता कोल्हापूर येथून निघेल. 5.47 वाजता सांगली स्थानकावर पोहोचेल आणि 5.50 वाजता मुंबईकडे प्रयाण करेल. ही गाडी 11 ऑगस्ट रोजी पहाटे 4.45 वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल.
हे ही वाचा : Weekend Getaways : वीकेंड टूर प्लॅन करताय? मुंबई-पुण्याजवळची ही ठिकाणं पावसाळ्यासाठी आहेत बेस्ट
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 07, 2025 8:36 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
रक्षाबंधन स्पेशल : मुंबई-कोल्हापूर दरम्यान सांगलीमार्गे विशेष रेल्वे, आजपासून आरक्षण सुरू