पाणीसाठा पुरेसा, चिंता मिटली! वारणा धरणाचे दरवाजे बंद, 83% पाणीसाठा; 50% पेरण्या पूर्ण
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
शिराळा तालुक्यात गेल्या सहा दिवसांपासून पाऊस कमी झाल्याने वारणा धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला आहे. त्यामुळे धरणाचे चारही स्वयंचलित दरवाजे आणि...
शिराळा : शिराळा तालुक्यात आणि वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या सहा दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे धरणाचे चारही स्वयंचलित दरवाजे आणि वीजनिर्मिती केंद्र बंद करण्यात आले असून, त्यातून होणारा पाण्याचा विसर्ग पूर्णपणे थांबवण्यात आला आहे.
मे महिन्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील भात पिकांच्या 50 टक्केच पेरण्या झाल्या आहेत, तर नदीकाठच्या शेतातील पिके पाण्याखाली गेल्यामुळे त्यांचे मोठे नुकसानही झाले आहे.
धरणात पाण्याची आवक सुरूच
गेल्या चोवीस तासांत पाथरपुंज येथे 3 मिमी, निवळे 1 मिमी, धनगरवाडा 1 मिमी आणि चांदोलीत 1 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे, धरणात पाण्याची आवक अजूनही पूर्णपणे थांबलेली नाही. सध्या धरणात 1360 क्यूसेक पाण्याची आवक सुरू आहे.
advertisement
चांदोली धरणाची सद्यस्थिती
- आजअखेर पाणीसाठा : 28.81 टीएमसी (83.76 टक्के)
- धरणाची पाणी पातळी : 621.15 मीटर
- गेल्या वर्षीचा पाणीसाठा : 28.89 टीएमसी (यावर्षीच्या तुलनेत किंचित जास्त)
गेल्या काही दिवसांपासून पावसाने तालुक्यात उघडीप दिल्याने, शेतकऱ्यांनी भात पेरणीच्या कामाला वेग दिला आहे. आजपर्यंत 2137 हेक्टरमध्ये भातरोपांची लावणी झाली असून, एकूण 5846 हेक्टरमध्ये भातशेती आहे. पावसाने जरी उघडीप दिली असली तरी धरणातील पुरेसा पाणीसाठा पाहता, आगामी काळात पाण्याची चिंता मिटली आहे.
advertisement
हे ही वाचा : आजचं हवामान: 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा धो-धो, 19 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने दिला अलर्ट
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 07, 2025 8:07 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
पाणीसाठा पुरेसा, चिंता मिटली! वारणा धरणाचे दरवाजे बंद, 83% पाणीसाठा; 50% पेरण्या पूर्ण









