94 कोटींची थकबाकी, विकासकामांवर परिणाम
महापालिका क्षेत्रात अनेक मालमत्ताधारकांकडे मालमत्ता कराचे तब्बल 94 कोटी रुपये थकीत आहेत. वेळोवेळी नोटिसा देऊनही मालमत्ताधारकांनी कर भरण्यास टाळाटाळ केली, ज्यामुळे महापालिकेचे उत्पन्न घटले आणि त्याचा परिणाम नागरी सेवा व विकास कामांवर होऊ लागला. त्यामुळेच, महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्या सूचनेनुसार संबंधित अधिकाऱ्यांनी घरपट्टी वसुलीसाठी ही कठोर मोहीम सुरू केली आहे.
advertisement
'थकबाकी भरा, अन्यथा...'
आयुक्त सत्यम गांधी यांनी थकबाकीदार मिळकतधारकांना त्वरित त्यांची थकबाकी भरून महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, "महापालिकेच्या उत्पन्नात घट झाल्याने नागरी सेवा आणि इतर विकास कामांवर परिणाम होत आहे, त्यामुळे थकीत कर वसुलीसाठी जप्तीची कार्यवाही अपरिहार्य झाली आहे." आजपासूनच (बुधवारपासून) मालमत्ता सील करण्याची कार्यवाही सुरू होणार असल्याची माहिती उपायुक्त अश्विनी पाटील यांनी दिली. पहिल्या दिवशी 10 मालमत्ता सील करण्याचे नियोजन आहे.
अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांनी सांगितले की, "जप्ती व वसुलीसाठी भागनिहाय पथकेही नेमण्यात आली आहेत. कर भरून जप्तीची अप्रिय कारवाई टाळावी", असे आवाहनही त्यांनी केले. तर सहायक आयुक्त आकाश डोईफोडे यांनी सांगितले की, "मुदतीत थकबाकी न भरणाऱ्या मालमत्ताधारकांवर कठोर कार्यवाही केली जाईल. यामध्ये मालमत्ता जप्त करणे, प्रसंगी लिलाव करणे, पाणीपुरवठा व इतर नागरी सुविधा तात्पुरत्या स्वरूपात बंद करणे आणि थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करणे यांसारख्या कार्यवाहीचा समावेश आहे."
हे ही वाचा : MHADA Lottery: हक्काच्या घरासाठी आणखी एक संधी, म्हाडाच्या छ. संभाजीनगर लॉटरीला मुदतवाढ, ही शेवटची तारीख
हे ही वाचा : चिपळूणकरांनो, मिळवा हक्काचं घर! नगरपरिषदेत 'आवास योजने'साठी स्वतंत्र कक्ष; लवकर करा अर्ज
