MHADA Lottery: हक्काच्या घरासाठी आणखी एक संधी, म्हाडाच्या छ. संभाजीनगर लॉटरीला मुदतवाढ, ही शेवटची तारीख

Last Updated:

MHADA Lottery: म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळात एक हजार 323 निवासी सदनिका व 18 भूखंडांची ऑनलाईन संगणकीय सोडतीद्वारे विक्री केली जाणार आहे.

MHADA Lottery: हक्काच्या घराची आणखी एक संधी, म्हाडाच्या छ. संभाजीनगर लॉटरीला मुदतवाढ
MHADA Lottery: हक्काच्या घराची आणखी एक संधी, म्हाडाच्या छ. संभाजीनगर लॉटरीला मुदतवाढ
मुंबई: म्हाडाच्या माध्यमातून गरजूंना स्वस्तात हक्काचं घर उपलब्ध होतं. म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळात आता हक्काचं घर घेण्याची आणखी एक संधी आहे. विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत एक हजार 323 निवासी सदनिका व 18 भूखंडांची ऑनलाईन संगणकीय सोडतीद्वारे विक्री केली जाणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत संपली आहे. मात्र, अधिकाधिक गरजूंना लाभ घेता यावा यासाठी म्हाडाने नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेला 31 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या अखत्यारित काही भूखंड येतात. यावरील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत सदनिका आणि भूखंडांसाठी ऑनलाईन सोडत जाहीर करण्यात आली आहे. ही सोडत तीन घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत एक हजार 148 सदनिका, म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत 154 सदनिक आणि 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत 21 सदनिका व 18 भूखंडांचा समावेश आहे.
advertisement
दरम्यान, संगणकीय सोडतीसाठी एकात्मिक गृहनिर्माण सोडत व्यवस्थापन प्रणाली व ॲपवर सदनिकांच्या अर्ज नोंदणी व अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते या प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला होता.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
MHADA Lottery: हक्काच्या घरासाठी आणखी एक संधी, म्हाडाच्या छ. संभाजीनगर लॉटरीला मुदतवाढ, ही शेवटची तारीख
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement