चिपळूणकरांनो, मिळवा हक्काचं घर! नगरपरिषदेत 'आवास योजने'साठी स्वतंत्र कक्ष; लवकर करा अर्ज

Last Updated:

चिपळूण नगरपरिषदेने शहरातील गरजू कुटुंबांना हक्काचे घर देण्यासाठी 'प्रधानमंत्री आवास योजना 2.0'ची अंमलबजावणी सुरू केली आहे. यासाठी बांधकाम विभागात...

Chiplun News
Chiplun News
चिपळूण : येथील नगरपरिषदेने शहरातील सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. केंद्र सरकारची 'प्रधानमंत्री आवास योजना 2.0' प्रभावीपणे राबवण्यासाठी नगरपरिषदेने बांधकाम विभागात एक स्वतंत्र कक्ष कार्यरत केला आहे. या योजनेमुळे आता शहरातील अनेक गरजू कुटुंबांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
राज्यात 'सर्वांसाठी घरे' संकल्पना
केंद्र सरकारने सप्टेंबर 2024 मध्ये 'प्रधानमंत्री आवास योजना 2.0' ची घोषणा केली होती. त्यानुसार, महाराष्ट्र शासनानेही 'सर्वांसाठी घरे' या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी केंद्र सरकारने एक खास वेब पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलवर इच्छुक लाभार्थींनी नोंदणी करणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबात पती-पत्नी आणि अविवाहित मुले/मुली (वय 18 वर्षांखालील) यांचा समावेश असणार आहे.
advertisement
योजनेसाठी महत्त्वाचे निकष (Criteria)
  • घराची अट : योजनेखाली अनुदान किंवा मदत मिळवण्यासाठी शहरी भागातील कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर देशाच्या कुठल्याही भागात घर नसावे.
  • उत्पन्नाची अट : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाखांहून कमी असावे.
  • पूर्वीच्या योजनेचा लाभ : लाभार्थीने मागील 20 वर्षांत कोणत्याही शासकीय आवास योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • घराची मालकी : योजनेअंतर्गत बांधण्यात येणारी घरे कुटुंबातील कर्त्या महिलेच्या किंवा पती-पत्नीच्या संयुक्त नावावर असतील. त्या कुटुंबात कर्ता सदस्य नसेल, तर घर कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या नावावर राहील.
advertisement
चिपळूण नगरपरिषदेने सुरू केलेल्या या स्वतंत्र कक्षामुळे नागरिकांना योजनेची माहिती मिळवणे आणि अर्ज करणे सोपे होणार आहे. असे असले तरी नागरिकांना कोणत्याही एजंट किंवा प्रलोभनांना बळी पडू नये. घर मिळवून देण्यासाठी पैशांची मागणी केली त्वरित योजना कार्यालयातील अधिकाऱ्यांना माहिती द्या. संबंधित व्यक्तीवर त्वरित कडक कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाने सांगितले आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/कोकण/
चिपळूणकरांनो, मिळवा हक्काचं घर! नगरपरिषदेत 'आवास योजने'साठी स्वतंत्र कक्ष; लवकर करा अर्ज
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement