घरफोडीचा गुन्हा चोरीपेक्षा अधिक गंभीर
घरफोडी हा गुन्हा पोलिस दलात चोरीपेक्षा अधिक गंभीर मानला जातो. 'डीवायएसपी' हे उपविभागाचे प्रमुख असल्याने, अशा गंभीर गुन्ह्यांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे की नाही, हे पाहणे त्यांचे कर्तव्य समजले जाते. घटनास्थळीच्या पुराव्यांची पाहणी करण्यासाठी भेट देणे आवश्यक असते. तसेच गुन्हेगारांनी कोणत्या मार्गाने प्रवेश केला, बाहेर कसे पडले आणि कोणत्या वस्तू चोरीला गेल्या, याची प्रत्यक्ष पाहणी करून तपास अधिकाऱ्यांना त्वरित व अचूक मार्गदर्शन करावे लागते.
advertisement
1980 मधील नियमामुळे घटनास्थळी जावे लागते
वर्ष 1980 मधील पोलीस दलातील सूचनेनुसार घरफोडीमध्ये किमान 75 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला असेल तर 'डीवायएसपी' घटनास्थळी भेट देतात. गेल्या काही वर्षात सोन्याने लाखाचा टप्पा ओलांडला असून, सव्वा लाखापर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे कोणत्याही घरफोडीत पाऊण किंवा एक तोळ्याचा ऐवज चोरीला गेला तरी त्याची किंमत 75 हजारांच्या पुढे जाते. त्यामुळे 'डीवायएसपीं'ना त्वरित घटनास्थळी धाव घ्यावी लागते.






