TRENDING:

Sangli News: काळ आला होता, पण..., सांगलीच्या कृष्णा नदीत मगरीचा हल्ला, थेट डोकंच पकडलं, सुटकेचा थरार!

Last Updated:

Sangli News: सांगलीत कृष्णा नदीत एका जलतरणपटूवर मगरीने हल्ला केला. थेट जबड्यात डोकं पकडल्यानंतर सुटकेचा थरार जलतरणपटूने सांगितला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली: 'काळ आला होता, पण वेळ आली नव्हती' अशी घटना सांगली शहरानजीक असणाऱ्या सांगलीवाडी येथे घडली. कृष्णा नदीपात्रामध्ये मगरींची संख्या मोठी आहे. बर्‍याचदा मगरी पाण्याबाहेर, रस्त्यावर आल्याच्या घटना घडत असतात. यावेळी मात्र मगरीने जलतरणपटूवर हल्ला केला. या भयंकर हल्ल्यातून अतिशय धाडसाने मगरीच्या जबड्याला ठोसा मारून लक्ष्मण जाधव हे निसटले. याच थरारक प्रसंगाबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement

सांगलीवाडीच्या बाजूला नदीपात्रात पोहत असताना लक्ष्मण हरी जाधव (रा. बालसम्राट चौक, सांगलीवाडी) यांच्यावर अजस्र मगरीने हल्ला चढवला आणि त्यांचे डोके जबड्यात पकडले. परंतु जाधव यांनी जबड्यावर हाताने प्रहार करून सुटका केली. पुन्हा मगरीने त्यांच्या खाद्यावर हल्ला केला. परंतु कडवा प्रतिकार करत जाधव यांनी मगरीला पळवून लावले. हा थरारक प्रसंग सांगलीवाडीमध्ये कृष्णानदी पात्रात घडला.

advertisement

सततची पोटदुखी, डॉक्टरांनी तपासताच दिसलं भयंकर, महिलेच्या पोटातून काढला 7 किलोचा गोळा!

सांगलीवाडीतील लक्ष्मण जाधव हे नियमितपणे  20 ते  22 वषांपासून कृष्णा नदीत पोहतात. "बुधवारी सकाळी ते पहाटेच्या सुमारास घरातून बाहेर पडले. स्वामी समर्थ घाटासमोर सांगलीवाडीच्या बाजूने ते नदीपात्रात उतरून पोहत होते. सहाच्या सुमारास नदीपात्रात असलेल्या जाधव यांच्यावर मगरीने हल्ला चढवला, त्यांचे डोके जबड्यात पकडले. मगरीने हल्ला केल्याचे तत्काळ ओळखून जाधव यांनी क्षणाचाही विचार न करता जबड्यावर हाताने प्रहार सुरू केला. जोरदार प्रतिकार पाहून मगरीने जाधव जबड्यातून डोके सोडले. परंतु पुन्हा डावा खांदा पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, मगरीच्या जबड्यावर जोरदार ठोसा दिल्याने मगरीने माघार घेतली, असे जाधव यांनी सांगितले.

advertisement

तीन महिन्यात दुसरा हल्ला

सांगलीत तीन महिन्यांपूर्वी 14 एप्रिल रोजी जलतरणपटू शरद जाधव यांच्यावर मगरीने माई घाट परिसरात हल्ला केला होता. जबड्यात पाय पकडल्यानंतर त्यांनी दुसऱ्या पायाने प्रहार करून सुटका करून घेतली होती. या घटनेपूर्वी अंकलखोप येथे 2 एप्रिल रोजी हल्ल्यात जखमी अजित गायकवाड यांचा मृत्यू झाला. आता जाधव यांची धाडसाने सुटका झाली. त्यामुळे 'काळ आला होता, पण वेळ आली नव्हती' अशी चर्चा आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
Sangli News: काळ आला होता, पण..., सांगलीच्या कृष्णा नदीत मगरीचा हल्ला, थेट डोकंच पकडलं, सुटकेचा थरार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल