तासगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयात अनेक बोगस लोक काम करतात. ही लोकं सरकारी कागदपत्रे हाताळतात. सामान्य लोकांना लुबाडतात. याच मुद्द्यावरून आक्रमक झालेले शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख प्रदीप माने यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक चंद्रकांत शिरढोणे यांच्या कानशिलात लगावली.
Solapur : जिल्हाधिकारी वरिष्ठांना गिफ्ट देणार आहेत, दागिणे घेऊन या; सोलापुरात सराफाची फसवणूक
advertisement
सरकारी कागदपत्रे बोगस लोकांच्या हातात दिल्याने बाळू लोखंडे या बोगस व्यक्तीलाही माने यांनी थोबाडीत लगावली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. दरम्यान, तासगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत तरी याबाबतची कोणतीही नोंद झाली नव्हती. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या कानशिलात लगावल्याच्या घटनेची चर्चा जोरदार सुरू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 19, 2023 11:45 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
Sangli : सरकारी कर्मचाऱ्यांचा अनागोंदी कारभार, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची दोघांना थप्पड
