TRENDING:

सांगलीत अचानक मोठा स्फोट, दसऱ्याची तयारी करणारे 8 जण होरपळले, दोघे गंभीर

Last Updated:

सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं शोभेच्या दारुत स्फोट घडून आठ जण जखमी झाले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं शोभेच्या दारुत स्फोट घडून आठ जण जखमी झाले आहेत. यातील दोन जणांची परिस्थिती चिंताजनक आहे. दसरा सणाच्या उत्साहात भर घालण्यासाठी शोभेची दारू (फटाके) तयार करत असताना ही जीवघेणी दुर्घटना घडली. ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कवठेएकंद गावातील ब्राह्मण गल्ली परिसरात घडली. येथे एका मंडळाचे काही कार्यकर्ते दसऱ्याच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्यासाठी पत्र्याच्या शेडमध्ये शोभेची दारू (firecrackers) बनवण्याचे काम करत होते. सायंकाळच्या सुमारास, तयार केलेल्या दारूची चाचणी घेत असताना अचानक जोरदार स्फोट झाला आणि दारूने पेट घेतला.

या स्फोटात शेडमध्ये काम करणारे आठ जण भाजून गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये आशुतोष बाळासाहेब पाटील (१६) या तरुणासह आनंद नारायण यादव (५५), विवेक आनंदराव पाटील (३८), गजानन शिवाजी यादव (२८), अंकुश शामराव घोडके (२१), प्रणव रवींद्र आराधे (२१), ओमकार रवींद्र सुतार (२१) आणि सौरभ सुहास कुलकर्णी (२७) यांचा समावेश आहे.

advertisement

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने धाव घेऊन जखमींना मदत केली. जखमींपैकी दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र, इतर सहा जणांना गंभीर भाजल्यामुळे तातडीने उपचारासाठी सांगली येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयीन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सहा जणांपैकी दोन व्यक्तींची प्रकृती सध्या चिंताजनक आहे आणि त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

advertisement

दसऱ्यासारख्या मोठ्या सणाच्या तोंडावर झालेल्या या दुर्घटनेमुळे कवठेएकंद गावावर शोककळा पसरली आहे. शोभेची दारू किंवा फटाके तयार करताना सुरक्षिततेचे नियम पाळले गेले नाहीत का, या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
सांगलीत अचानक मोठा स्फोट, दसऱ्याची तयारी करणारे 8 जण होरपळले, दोघे गंभीर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल