संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
गुरूपोर्णिमेच्या निमित्ताने एकनाथ शिंदेंचा कार्यक्रम आधीच ठरला होता. शिंदेंनी शहांच्या पायावर डोकं ठेवलं, चाफ्याची फुलं ठेवली. पायाला चंदन लावलं. त्यानंतर ते इतर नेत्यांना भेटले. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची नेहमीप्रमाणे तक्रार केली. शिंदेंनी यावेळी एक ऑफर ठेवली की, मराठी माणसांची एकजुट तुटली नाही तर आपल्याला धोका होईल. मला मुख्यमंत्री केली तर त्यावर उपाय निघेल. मी मुख्यमंत्री झालो तर या सगळ्या गोष्टी मी थांबवतो. त्यावर अमित शहांनी शिंदेंना सांगितलं की, मुख्यमंत्री तर भाजपचाच होईल. त्यानंतर शिंदेंनी सांगितलं की, मी माझ्यासह संपूर्ण गट भाजपमध्ये विलिन व्हायला तयार आहे, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे.
advertisement
शिंदेंची भाजपला ऑफर
राज्यात ऑगस्टच्या अंतापर्यंत काही घडामोडी घडतील. मुंबईत ईडीच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात उलथापालथ होईल, असंही संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे. तपास यंत्रणांनी फाईल उघडण्यास सुरूवात केली आहे. शिंदेंच्या लोकांवर आता कारवाई होण्याच्या शक्यता आहे. विधानसभा आणि लोकसभेचं चित्र वेगळं होतं. आता त्यांना अडचणींना तोंड द्यावं लागेल, असं शिंदेंना वाटतं. त्यामुळे त्यांनी भाजपला अशी ऑफर दिली, असंही संजय राऊत म्हणाले.