दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार असून आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना शरद पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्रित येईल, अशी अजिबातही शक्यता दिसत नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही पवारांसोबत काम करतोय, त्यांच्या भूमिका आम्हालाही कळतात
शरद पवार यांच्या एका मुलाखतीतील ओळींवरून काही लोक सुतावरून स्वर्ग गाठतायेत. आम्ही अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करतोय, त्यामुळे त्यांच्या भूमिका आम्हाला माहिती आहेत.
advertisement
जातीयवादी आणि धर्मांध शक्तींसोबत शरद पवार कदापि जाणार नाहीत, असे शरद पवार म्हणाले.
ज्यांनी आमचा आणि पवारांचा पक्ष फोडला, त्यांच्यासोबत शरद पवार कसे जातील?
ज्या विचारांसाठी शरद पवार यांनी उभा आयुष्यभर संघर्ष केला. अनेक वर्षे विरोधी पक्षात राहिले. ते आता महाराष्ट्रद्वेषी शक्तींसोबत जाणार नाही. ज्यांनी त्यांचा आणि आमच्या दोघांचाही पक्ष फोडला, त्या लोकांबरोबर शरद पवार कसे जातील? असा सवाल करीत जे जायचे ते सोडून गेले, जे गेलेत त्यांचे चेहरे बघा, तिकडे ते अजिबात सुखी नाहीत, असे राऊत म्हणाले.
महापालिका निवडणुकीत शिवसेना आपली ताकद दाखवून देईल
नाशिकपासून धुळे, मालेगावपर्यंत उत्तर महाराष्ट्रातील सर्व निवडणुका शिवसेना ताकदीने लढवेन. सर्व महत्वाच्या महापालिकांत शिवसेना आपली ताकद दाखवून देईल, असे राऊत म्हणाले. चार महिन्यात निवडणुका घ्या, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. प्रत्येक पालिकेची बांधणी, मार्गदर्शन सुरू आहे. नाशिकला मोठे शिबीर झाले, प्रत्येक महापालिकेअंतर्गत असे शिबीर होतील, असेही राऊत म्हणाले.