TRENDING:

Sanjay Raut: 'ही तर लोकेच्छा, कुणाच्या आदेशाची गरज नाही', ठाकरे बंधू युतीवर राऊतांचा काँग्रेसला सणसणीत टोला

Last Updated:

काँग्रेसने 'एकला चलो रे'चा नाराही दिला होता. राज्यात सध्या सुरु असलेल्या मनसेच्या मविआतील आघाडीवर संजय राऊतांनी ट्विटकरत भाष्य केलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मनसेची साथ सोडावी आणि आमच्यासोबत यावं अशी ऑफर काँग्रेसने ठाकरेंच्या शिवसेनेला दिली आहे. महाविकास आघाडी असताना उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा विश्वासात न घेता मनसेसोबत वेगळी चूल मांडल्यानंतर काँग्रेसमध्ये काहीशी नाराजी दिसते. त्यामुळेच काँग्रेसने 'एकला चलो रे'चा नाराही दिला होता. राज्यात सध्या सुरु असलेल्या मनसेच्या मविआतील आघाडीवर संजय राऊतांनी ट्विटकरत भाष्य केलं आहे.
Raj & Uddhav Thackeray
Raj & Uddhav Thackeray
advertisement

मनसेनं परप्रातियांविरोधात घेतलेल्या भूमिकेचा मुद्दा पुढे करत,काँग्रेसनं महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी केलीय. राज्यातील काँग्रेस नेत्यांनी मनसेला दूर ठेवण्याची भूमिका घेतली असतानाच उद्धव ठाकरे मात्र काँग्रेसलासोबत घेण्यासाठी सकारात्मक असल्याचं बोललं जातंय. उद्धव ठाकरे दिल्लीतील काँग्रेसच्या हायकमांडच्या संपर्कात असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे मविआत फाटाफूट झाली तर दोघांनाही तोटा होईल. भाजपला प्रत्युत्तर द्यायचं झाले तर विरोधकांची एकजूट राहणं फार महत्वाचं आहे असं ठाकरेंच्या पक्षाचं म्हणणं आहे.

advertisement

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

आता यावर संजय राऊत म्हणाले, दिल्लीतून आदेश आल्याशिवाय मनसेला आघाडीत घेणार नाही. मुंबई काँग्रेसचा व्यक्तीगत निर्णय असू शकत. मात्र शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले आहेत, ही लोकांची इच्छा आहे, त्यासाठी कुणाच्या आदेश किंवा परवानगीची गरज नाही. शरद पवार आणि डावे पक्ष सुद्धा एकत्र आहेत... मुंबई वाचवा...

advertisement

सत्याचा मोर्चा एकत्रित काढला मग निवडणुकीत वेगळे का लढता?

मविआत मनसे हवी, याबाबत शरद पवार सकारात्मक असल्याची माहिती मिळत असून शरद पवारांनी काँग्रेस नेत्यांना फोन केल्याची माहिती मिळत आहे..महाविकास आघाडी म्हणून मुंबई पालिका निवडणूक लढली जावी असं पवारांचं मत आहे. सत्याचा मोर्चा एकत्रित काढला मग निवडणुकीत वेगळे का लढता? असा सवाल पवारांनी केल्याची माहिती मिळत आहे.

advertisement

काँग्रेसची अडचण काय?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव?कोणती करावी फवारणी? कृषी तज्ज्ञांनी दिली माहिती
सर्व पहा

मनसेची मविआतील एन्ट्री काँग्रेसच्या उत्तरभारतीय व्होट बँकेसाठी अडचणीची ठरणार आहे. त्यामुळं काँग्रेसनं पालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा दिल्याची चर्चा आहे . राज्यातील काँग्रेसचे नेते भलेही एकला चालो रेचा नारा देत असले तरी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे काँग्रेसच्या हायकमांडशी असलेले संबंध यावर मुंबई पालिकेतील आघाडीचं भवितव्य अवलंबून असणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sanjay Raut: 'ही तर लोकेच्छा, कुणाच्या आदेशाची गरज नाही', ठाकरे बंधू युतीवर राऊतांचा काँग्रेसला सणसणीत टोला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल